नागपूरकर असल्याचा अभिमान, पण मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:54 PM2019-02-20T22:54:52+5:302019-02-20T22:55:19+5:30

नागपूरकर असल्याचा अभिमान मला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Proud of being a Nagpurkar, but after the CM, i considered the entire state - Devendra Fadnavis | नागपूरकर असल्याचा अभिमान, पण मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला - देवेंद्र फडणवीस

नागपूरकर असल्याचा अभिमान, पण मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला - देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

मुंबई -   गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाला त्यांच्या हिश्शाचं असं काही मिलालेलं नाही. त्यामुळे विदर्भामध्ये नाराजी आहे. मराठवाड्चाही तोच प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपादाची जबाबदारी स्वीकारल्यावर विदर्भाच्या हक्काचं असेल ते आम्ही विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला. नागपूरकर असल्याचा अभिमान मला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुखने मुलाखत घेतली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले आता वेगळ्या विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, ''तुम्हाला हेडलाइनसाठी अनेक गोष्टी देऊ शकतो. पण,गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाला त्यांच्या हिश्शाचं असं काही मिलालेलं नाही. त्यामुळे विदर्भामध्ये नाराजी आहे. मराठवाड्चाही तोच प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपादाची जबाबदारी स्वीकारल्यावर विदर्भाच्या हक्काचं असेल ते आम्ही विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला. नागपूरकर असल्याचा अभिमान मला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला, 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुख याने घेतलेली मुलाखत  हे खास वैशिष्ट्य ठरले. यावेळी महाराष्ट्रातील माणसांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असा प्रश्न रितेश देशमुखने विचारला. रितेशचा हा प्रश्न सफाईदारपणे टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण सध्या 2019 आणि 2014 साठी पंतप्रधानपद बूक झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोण पंतप्रधानपदी बसेल या प्रश्वावर आपण 2025 मध्ये चर्चा करू.''   

Web Title: Proud of being a Nagpurkar, but after the CM, i considered the entire state - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.