पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यभरात निषेध, पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरल्या : विचारवंतांच्या खुनाचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:14 AM2017-09-07T03:14:33+5:302017-09-07T03:15:40+5:30

कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यातील विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. वैचारिक प्रतिवाद शक्य नसल्याने हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे, विचारवंतांच्या खुनाचे सत्रच सुरू झाले आहे

 Prohibition of murder of journalist Gauri Lankesh in the state, progressive organizations came out on the streets: The killing session of the leaders started | पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यभरात निषेध, पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरल्या : विचारवंतांच्या खुनाचे सत्र सुरूच

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यभरात निषेध, पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरल्या : विचारवंतांच्या खुनाचे सत्र सुरूच

Next

पुणे/मुंबई : कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यातील विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. वैचारिक प्रतिवाद शक्य नसल्याने हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे, विचारवंतांच्या खुनाचे सत्रच सुरू झाले आहे, अशी भावना पुण्यातील निषेध सभेत व्यक्त करण्यात आली.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुरोगामी संघटना, चळवळीतील नेते, लेखक, विचारवंत, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने पुणेकर एस. पी. महाविद्यालयाजवळ जमले होते. विद्या बाळ म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन तोंडांनी बोलतात. त्यांनी असहिष्णू प्रकारांचा निषेध केला पाहिजे. सीपीएमचे अजित अभ्यंकर म्हणाले, राज्यघटना उलथून टाकण्यासाठी अशा कृती केल्या जात आहेत. एक गट हत्या करणाºयांचा, एक विचारधारेचा आणि एक राजकारण्यांचा अशी समविभागणी करण्यात आली आहे. केवळ निषेध सभा घेऊन काहीही होणार नाही. आपल्याला लढा पुकारावा लागेल. महात्मा गांधी यांची हत्या ही पहिली राजकीय दहशतवादी हत्या होती.
पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचे मारेकरी सापडत नाहीत. मग कसले बहुमतातले सरकार, कसला पारदर्शी कारभार या देशात कष्टकरी, शेतकरी, कर्मचारी सर्वच अस्वस्थ असल्याचे चित्र असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव पंढरपूर येथे म्हणाले.
मुंबईत कँडल मार्च
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेर्धाथ मुंबईतील पत्रकारांनी प्रेस क्लब बाहेर कँडल मार्च काढला़ यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सहभागी झाले होते़ शहर व उपनगरात ठिकठिकाणी या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला़ हत्येचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले. फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चांना उधाण आले. अनेकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेचा निषेध केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर लंकेश यांची हत्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रेस क्लबने या हत्येविरुद्ध रस्तावर उतरुन मेणबत्ती मोर्चा काढला.
गौरी लंकेश हत्येच्या निषेधार्थ ठाण्यात मूक निदर्शने-
ठाणे : ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या बंगळुरू येथील निर्घृण हत्येच्या निषेधार्थ ठाणे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वराज्य इंडिया, श्रमिक जनता संघ, धर्मराज्य पक्ष अशा विविध संघटनांनी बुधवारी सायंकाळी मूक निदर्शने केली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कुलबुर्गी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटण्याचा घृणास्पद प्रकार भारतातील जातीयवादी व धर्मांध शक्तींनी केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

Web Title:  Prohibition of murder of journalist Gauri Lankesh in the state, progressive organizations came out on the streets: The killing session of the leaders started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.