खासगी वाहने, बसना हायवेवर टोलमाफी ?

By admin | Published: December 23, 2014 03:21 AM2014-12-23T03:21:14+5:302014-12-23T03:21:14+5:30

केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालय तयार करीत असलेला प्रस्ताव मंजूर झाला तर बस आणि मोटारी, जीप व दुचाकी यासारख्या खासगी

Private vehicles, the highway tollffee? | खासगी वाहने, बसना हायवेवर टोलमाफी ?

खासगी वाहने, बसना हायवेवर टोलमाफी ?

Next

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालय तयार करीत असलेला प्रस्ताव मंजूर झाला तर बस आणि मोटारी, जीप व दुचाकी यासारख्या खासगी वाहनांमधून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही प्रकारचा टोल न भरता प्रवास करणे शक्य होणार आहे.
मंत्रालयातील सूत्रांनुसार राष्ट्रीय महामार्गांवर बस व सर्व प्रकारच्या बिगर व्यापारी वाहनांना टोल आकारणी बंद केली, तर २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात सुमारे २७ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडेल.
मात्र मंत्रालय तयार करीत असलेल्या प्रस्तावात टोलच्या रूपाने बुडणारा हा महसूल अन्य मार्गाने भरून काढण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. पेट्रोल व डिझेलवर लिटरमागे एक रुपया अतिरिक्त उपकर लावून व नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व खासगी मोटारींवर किंंमतीच्या दोन टक्के एवढे शुल्क एकदाच आकारून बुडणा-या टोलहून जास्त रक्कम मिळू शकेल, असे मंत्रालय म्हणते. ज्यांच्याकडे सध्या खासगी मोटारी आहेत त्यांच्याकडून प्र्रत्येक मोटारीमागे दोन टक्के शुल्कापोटी एकदाच एक हजार रुपये घ्यावेत, असे हा प्रस्ताव म्हणतो. अशा प्रकारे तिहेरी पर्याय स्वीकारले तर एका वर्षात ३२,६०९ कोटी रुपयांचा महसूल मिळेल व तो खासगी वाहनांवरील टोलमधून मिळणाऱ्या २६,२९० कोटी रुपयांच्या टोलहून अधिक असेल, असे गणित मंत्रालयाने मांडले आहे.
सूत्रांनुसार रस्ते वाहतूक व महामागर्मंत्री नितीन गडकरी स्वत: प्रस्तावास अंतिम स्वरूप देत असून लवकरच या संदर्भात पंतप्रधानांसाठी सविस्तर ‘प्रेझेन्टेशन’ केले जाईल. असा प्रकारच्या व्यवस्थेस ‘पीएमओ’ने याआधीच अनुकुलता दर्शविली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवरील वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अभ्यास केल्यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले की, खासगी प्रवासी वाहनांमुळे टोलनाक्यांवर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते पण एकूण टोलपैकी जेमतेम १४ टक्के टोल त्यांच्याकडून वसूल केला जातो. त्यामुळे अशा वाहनांना टोलमधून वगळून तो महसूल अन्य मार्गाने मिळविण्याचा पर्याय सूचविण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Private vehicles, the highway tollffee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.