वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 02:28 PM2018-08-27T14:28:49+5:302018-08-27T14:30:06+5:30

नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे.

People caught with Vaibhav Raut are not seekers of Sanatan, claim of Sanatan Sanstha | वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा

वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा

Next

मुंबई - नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा करून अटक आरोपींबाबत आपले हात झटकले आहेत. तसेच मराठा आंदोलन आणि ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होतू होता, असा करण्यात येत असलेला आरोपही सनातनने फेटाळला आहे. 

नालासोपारा येथे आढळलेली स्फोटके, त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असलेल्या आरोपींना अटक करण्यात आलेल्या अटकेनंतर या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही. ते सनातनचे साधक नव्हते, असा दावा यावेळी सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला. "तपासात सनातनचे थेटपणे नाव आलेले नाही. मराठा आंदोलन तसेच ईददरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता, असा करण्यात आलेला आरोप धादांत खोटा आहे. असे राजहंस यांनी सांगितले.  

सनातनबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या येत असून, अशा बातम्या प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातनकडून देण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सनातनला विनाकारण गोवण्यात येत असून, अंनिसकडून आम्हाला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोपही सनातनच्या प्रवक्त्यांनी केला.  

Web Title: People caught with Vaibhav Raut are not seekers of Sanatan, claim of Sanatan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.