पालकांनो, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शाळेचे मध्यम ठरवण्याआधी या प्रश्नांची उत्तरे शोधा - डॉ. वसंत काळपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 12:31 PM2017-09-21T12:31:38+5:302017-09-21T12:34:54+5:30

मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळांना पर्याय नसल्याचा सूर मराठी शाळा संवर्धनासाठी आयोजित करण्यात नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत दिसून आला. माध्यम निवडताना काय विचार करावा याबाबत बालभारतीचे माजी संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी लोकमतकडे आपले मत व्यक्त केले आहे.

Parents, find answers to these questions before deciding whether your child or girl's school is middle-class - Dr. Spring Kalpande | पालकांनो, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शाळेचे मध्यम ठरवण्याआधी या प्रश्नांची उत्तरे शोधा - डॉ. वसंत काळपांडे

पालकांनो, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शाळेचे मध्यम ठरवण्याआधी या प्रश्नांची उत्तरे शोधा - डॉ. वसंत काळपांडे

Next

मातृभाषेतून शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असते. आपल्या राज्यात लाखो मराठी शाळा उत्कृष्ट काम करत आहेत पण काही पालक घरात मराठी वातावरण असताना/आर्थिक परिस्थिती नसताना केवळ प्रतिष्ठेसाठी इंग्रजी शाळांची वाट धरतात. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेचे माध्यम निवडताना व त्याच्या शाळोबाबत विचार करताना काही मुद्द्यांचा विचार करावा  म्हणून याबाबत मी तुम्हा पालकांसमोर पुढील प्रश्न ठेवत आहे .

१) केवळ प्रतिष्ठेची बाब म्हणून आपण मुलाच्या शाळेचे माध्यम ठरवत नाही ना ? 

२) शाळेची फी आणि इतर खर्च आपल्याला परवडण्या सारखा आहे का ? या खर्चामुळे अनावश्यक ताण येऊन घरातील वातावरण सतत चिंताग्रस्त तर राहात नाही ना ? ( तसं असेल तर आपल्या मुलांच्या मानसिक स्थितीवर आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होईल).

३) मुलांसाठी खेळणी, पुस्तके त्यांच्या आवडीच्या इतर वस्तू खरेदी करण्यास आपल्याकडे पैसा उरतो काय ?

४) शाळेकडून आपले आर्थिक शोषण होते अशी भावना आपल्या मनात येते का ? 

५) शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून आपल्याला शाळेत मिळणार्या वागणुकीबद्दल आपण समाधानी असतो का ? शाळेत वावरताना आपल्याला मोकळेपणा वाटतो काय ? कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड तर वाटत नाही ना ?

६) केवळ उच्चभ्रू समाजात वावरल्यामुळे बाकीच्या समाजाबाबत तुच्छतेची भावना तर निर्माण होत नाही ना ?

७) आपली मुले शाळेत काय शिकली आहेत; त्यांना अभ्यासात काही अडचण आली तर आपण मदत करु शकतो का ?

८) आपल्या मुलांशी व त्यांच्या शिक्षकांशी आपण आत्मविश्वासाने संवाद साधू शकतो का ?

९) आपला पाल्य गणित आँलिम्पियाड, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि शाळेबाहेरील इतर संस्थांनी आयोजीत केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो का ? असल्यास त्याच्या संपादणुकीबाबत आपण समाधानी आहात का ? 

१०) मुलाची शोधकवृत्ती आणि सर्जनशिलता यांना शाळेत वाव मिळतो का? 

११)आपला पाल्य इंग्रजीत स्वयंस्फुर्तीने लिहितो का ?

१२)आपली मुले विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होतात का ? 

या प्रश्नांची उत्तरे आपली मुले शाळेत गेल्यावर शोधण्याचा प्रयत्न केल्यास फार उशिर झाला असण्याची शक्यता आहे. इतक मुलांचे काय अनुभव आहेत ते डोळसपणे पाहा. त्यांच्या पालकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहा. आपल्या मुलाला इंग्रजी नर्सरी किंवा केजीमध्ये घातले असेल तर पुढे भविष्य कसे असेल याचा विचार करा.  या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि मुलाला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं याचा निर्णय घ्या.

(डाॅ. वसंत काळपांडे बालभारतीचे माजी संचालक आणि  राज्य मंडळ (एसएससी बोर्ड)चे माजी अध्यक्ष आहेत)

Web Title: Parents, find answers to these questions before deciding whether your child or girl's school is middle-class - Dr. Spring Kalpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत