शिवसेनेच्या तंबीनंतर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा शो रद्द

By admin | Published: April 22, 2015 12:13 PM2015-04-22T12:13:13+5:302015-04-22T12:13:23+5:30

शिवसेनेच्या तिखट विरोधानंतर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा पुण्यातील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे.

Pakistani singer Atif Aslam cancels show after Shiv Sena crackdown | शिवसेनेच्या तंबीनंतर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा शो रद्द

शिवसेनेच्या तंबीनंतर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा शो रद्द

Next
>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. २२ - शिवसेनेच्या तिखट विरोधानंतर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा पुण्यातील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे.  हा कॉन्सर्ट उधळून लावण्याची धमकी शिवसेनेने दिली होती व यानंतर आयोजकांनी हा शो रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पुण्यात हडपसर येथे २५ एप्रिल रोजी पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टचे सुमारे एक हजारहून अधिक तिकीटही विकले गेले होते. पण शिवसेनेच्या चित्रपट सेनेने हा शो उधळून लावण्याची धमकी दिली होती. शिवसेनेने भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या कार्क्रमांना नेहमीच विरोध दर्शवला आहे. शिवसेनेच्या धमकीनंतर आयोजकांनी हा कॉन्सर्ट रद्द केला आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणाये आधी देशाचा विचार करा, सच्चे देशभक्त व्हा. त्यांच्या या विचारांचे अनुकरण करत आम्ही आतिफ अस्लमचा शो रद्द केला आहे अशी माहिती आयोजक संजय साठे यांनी दिला आहे. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे व जनतेच्या भावनांचा आदर करुनच आम्ही हा निर्णय घेतला असून तिकीट घेणा-यांचे पैसेही परत केले जातील असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Pakistani singer Atif Aslam cancels show after Shiv Sena crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.