देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 02:47 PM2018-03-04T14:47:28+5:302018-03-04T15:01:38+5:30

देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

Only 'Navy' in the country, Congress should fight only by-elections: Fadnavis | देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

googlenewsNext

मुंबई : देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना फडणवीसांनी डाव्या संघटनांना आणि कॉंग्रेसला चिमटे काढले.  मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस बोलत होते. 
त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशातून डावे हद्दपार झाले आहेत. ते केवळ नावालाच उरले आहेत. आता पूर्वेकडील राज्यातही लाल सूर्य मावळला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत असा टोला फडणवीसांनी लगावला.
 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्यांनी भाजपवर विश्वास दाखविल्यानेच आम्ही ही मजल मारू शकलो' असं फडणवीस म्हणाले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचं संघटन कौशल्य यामुळेच हा विजय संपादन झाल्याचं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. 
यावेळी बोलताना फडणवीसांनी, हा विजय केवळ ट्रेलर आहे,  पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. कर्नाटकात आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. पूर्वेकडील राज्यात भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या सुनील देवधर यांचंही फडणवीस यांनी कौतुक केलं. देवधर यांनी दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. त्याचंच हे फळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो- मुख्यमंत्री 
आज पार पडलेल्या नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले नाहीत.  त्यावर प्रतिक्रिया देताना, मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. 

  

Web Title: Only 'Navy' in the country, Congress should fight only by-elections: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.