हज यात्रेसाठी बुधवारपासून ऑनलाईन अर्ज - मुख्तार नकवी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:46 PM2017-11-12T22:46:42+5:302017-11-12T22:47:31+5:30

पुढच्यावर्षी होणार्‍या हज यात्रेसाठी भारतातून जाणार्‍या इच्छिुक भाविकांना येत्या १५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. हज कमिटीच्या मार्फत ही सुविधा उपलब्ध करण्यात आले असून स्वतंत्र मोबाईल अँप बनविले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अबास नकवी यांच्या हस्ते रविवारी ते कार्यान्वित करण्यात आले.

Online application for Haj Yatra from Wednesday - Mukhtar Naqvi | हज यात्रेसाठी बुधवारपासून ऑनलाईन अर्ज - मुख्तार नकवी  

हज यात्रेसाठी बुधवारपासून ऑनलाईन अर्ज - मुख्तार नकवी  

Next
ठळक मुद्देमोबाईल अँप कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :   पुढच्यावर्षी होणार्‍या हज यात्रेसाठी  भारतातून जाणार्‍या इच्छिुक भाविकांना येत्या १५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. हज कमिटीच्या मार्फत ही सुविधा उपलब्ध करण्यात आले असून स्वतंत्र मोबाईल अँप बनविले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अबास नकवी यांच्या हस्ते रविवारी ते कार्यान्वित करण्यात आले.
नवीन हज धोरणानुसार २0१८ मध्ये हज यात्रा पार पाडली जाणार असून या धोरणाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नकवी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
हज धोरण समितीने गेल्या महिन्यात २८ शिफारशीचा अहवाल अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामध्ये देशभरातील सध्याची २१ प्रस्थानाची संख्या (एम्ब्रकेशन पाईट) ९ पर्यत र्मयादित करणे,४५ वर्षावरील चार महिलांना स्वतंत्रपणे (मरहम) हज यात्रा करण्यास अनुमती देणे आदी वादग्रस्त शिफारशींचा समावेश आहे. त्याला देशभरातून विरोध होत आहे. त्याबाबत बोलताना मंत्री नकवी म्हणाले,‘ प्रस्थान स्थळ कमी केल्याने यात्रेकरुचा विमान खर्च कमी होणार आहे. मात्र त्याबाबत नागरिकांची मते विचारात घेवून निर्णय घेण्यात येईल. यात्रेकरुंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत एक महिन्यापूर्वीपासून हज यात्रेच्या अर्जाची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. यावेळी हज कमिटीचे अध्यक्ष  चौधरी मेहबूब अली कैसर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मकसूद अहमद खान व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Online application for Haj Yatra from Wednesday - Mukhtar Naqvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.