एक दिवस, एक लेखक, दुर्लक्षित लेखकांसाठी उपक्रम

By admin | Published: August 4, 2016 05:21 AM2016-08-04T05:21:38+5:302016-08-04T05:21:38+5:30

साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक यांच्या साहित्य व जीवनपटावर फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून ‘एक दिवस, एक लेखक’ हा नवा उपक्रम सुरू केला

One day, one writer, neglected writers enterprises | एक दिवस, एक लेखक, दुर्लक्षित लेखकांसाठी उपक्रम

एक दिवस, एक लेखक, दुर्लक्षित लेखकांसाठी उपक्रम

Next


मुंबई : प्रसिद्धीपासून दूर असलेल्या परंतु साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक यांच्या साहित्य व जीवनपटावर फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून ‘एक दिवस, एक लेखक’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत प्राथमिक टप्प्यात लेखक दिलीप मालवणकर, ज्येष्ठ कवी शुक्राचार्य गायकवाड, ज्येष्ठ कवयित्री हिरा बनसोडे, लेखक चंद्रशेखर कुलकर्णी, कवी जयंत कुटुंबे, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत वट्टमवार, गायक विजय पुंडलिक जाधव, लेखक सदानंद पुंडगे यांचा समावेश करण्यात आला आहे. निर्माता-दिग्दर्शक सचिन सुशील यांनी सांगितले की, ‘एक दिवस, एक लेखक’ या पहिल्या टप्प्यात लेखक आणि त्यांच्या साहित्य संपदेची माहिती संकलित करून ब्लॉग
आणि फेसबुक पेजवर उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)

Web Title: One day, one writer, neglected writers enterprises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.