जुन्या नोटा जप्तीचे प्रकरण : पोलिसांनी आरबीआयला पाठवलं पत्र; चौथा आरोपी अटक, आणखी तिघांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 07:08 PM2017-09-27T19:08:47+5:302017-09-27T19:11:28+5:30

जुन्या पाचशे व हजारांच्या नोटाची डिलिंग करणा-या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी रिझर्व बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाला माहिती दिली असून या जुन्या चलनाविषयीचा तपास नागपूर आयकर विभाग करणार आहे.

Old currency seizure case: Police sent letter to RBI; Fourth accused arrested, more search for three more | जुन्या नोटा जप्तीचे प्रकरण : पोलिसांनी आरबीआयला पाठवलं पत्र; चौथा आरोपी अटक, आणखी तिघांचा शोध सुरू

जुन्या नोटा जप्तीचे प्रकरण : पोलिसांनी आरबीआयला पाठवलं पत्र; चौथा आरोपी अटक, आणखी तिघांचा शोध सुरू

googlenewsNext

अमरावती : जुन्या पाचशे व हजारांच्या नोटाची डिलिंग करणा-या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी रिझर्व बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाला माहिती दिली असून या जुन्या चलनाविषयीचा तपास नागपूर आयकर विभाग करणार आहे. या प्रकरणात चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली असून आणखी तिघांचा कसून शोध सुरू आहे. 

जुन्या पाचशे व हजारांच्या ८४ लाख ८६ हजार ५०० रुपयांच्या नोटांची डीलिंग करण्यासाठी नागपूर येथील रहिवासी अमीत वाकडे अमरावतीत आला होता. जुन्या नोटा बदल्यात नवीन नोटा देण्याची डीलिंग होण्यापूर्वीच अमरावती पोलिसांनी अमित वाकडेसह वाहनचालक पुष्पेन्द्रकुमार मिश्रा व मध्यस्थी करणारा चपराशीपु-यातील रहिवासी संदीप गायधने या दोघांना अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध ४१(१)(४) कलमान्वये गुन्हा नोंदविला. गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी डिलिंगशी संबंधित असणा-या गैसोद्दीन ऊल्लाद्दोन पठाण या चौथ्या आरोपीला अटक केली आहे. डीलिंग करून देण्याचे आश्वासन देणा-या त्याच्या तीन सहकार्यांचा शोध पोलीस घेत आहे. जुन्या नोटांच्या डीलिंगसंदर्भात अमरावती पोलिसांनी आयकर विभाग व आरबीआयला कळविले असून यासंबंधाने अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार जुन्या नोटांसंदर्भातील पुढील चौकशी नागपूर आयकर विभाग करणार आहे. 
अमित वाकडेचा ६० कोटींचा 'टर्नओव्हर' -
पोलीस सूत्रानुसार, जुन्या नोटांच्या डीलिंगसाठी अमरावतीत आलेला अमित वाकडे हा काही वर्षांपूर्वीच कापूस व्यवसायात आला. तत्पूर्वी तो चंद्रपुरातील एका कॉलेजमध्ये मानसशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. कापूस व्यवसायात त्याचा ६० कोटींचा वार्षिक 'टर्नओव्हर' असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. अमित वाकडे हा अमरावतीत अनेकदा आला आहे. त्याची अमरावतीमधील वेलकम पाईन्टवर चायनिज हातगाडी लावणाºया गॅसोद्दीन मुल्लाऊद्दीन पठाण (रा. इंदला, पोहरा) सोबत ओळख झाली. दरम्यान वाकडेने गॅसोद्दीनसमोर नोटा बदलविण्याविषयी गोष्ट काढली. त्यानुसार अमितने गवंडी काम करणाºया त्या इसमाची भेट घेतली. त्याने संदीप गायधनेचे नाव पुढे करून तुमचे काम गायधने करू शकते, असे सांगितले. त्यानुसार अमितने संदीप गायधनेची भेट घेतली. त्याने जुन्या नोटांच्या बदल्यात २५ टक्के रक्कम मिळण्याचे आश्वासन अमित वाकडेला दिले.  मात्र, त्यापैकी १५ टक्के रक्कम देण्याचे व उर्वरीत १० टक्के त्याच्या सहकार्याने दिले जाईल, असे अमितला सांगितले. त्यानुसार संदीप गायधनेने त्याचे सहकारी राहुल कविटकर (रा.गोपाल नगर, मूळ रहिवासी शिरजगाव कस्बा), सचिन व वानखडे या तिघांशी अमितचे बोलणे करून दिले. त्यानंतर ८४ लाख ८६ हजार ५०० नोटांच्या डिलिंगची तारीख निश्चित झाली. मंगळवारी अमरावतीच्या जेलरोडवर ही डीलिंग होणार होती. तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक करून कारसह जुन्या नोटा जप्त केल्या. 
बॉक्स
जुन्या नोटा आढळल्यास पाचपटीने दंड-
 ८ नोव्हेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत नोटाबंदी करण्यात आली. नागरिकांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितले. त्यानुसार जुन्या नोटा बँकात गोळा करण्यात आल्या. त्यानंतर शासनाने काही नियमावली तयार केल्या. नोटाबंदीनंतर जरर जुन्या नोटा सापडल्या तर त्या रक्कमेच्या पाच पटीने दंड देण्यात येईल. हा दंड देण्याचा अधिकार प्रथमश्रेणी न्यायदंडाधिका-यांना राहणार आहे.

Web Title: Old currency seizure case: Police sent letter to RBI; Fourth accused arrested, more search for three more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.