ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

By admin | Published: February 4, 2016 01:22 AM2016-02-04T01:22:31+5:302016-02-04T01:22:31+5:30

ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

North India is the main part of the country | ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

Next

पुणे : ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग असल्याची भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह व भारत अस्मिता फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.
रिजिजू म्हणाले, ‘‘राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीमुळे आपले स्वातंत्र्य आणि आवाज अबाधित असल्यानेच आपल्या देशात सहिष्णुतेचे वातावरण आहे. आवाज आणि स्वातंत्र्य दाबले गेले, तर कालांतराने त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे हिंसाचार वाढतो. अनेकदा आपल्या ताकदीला आपणच ओळखत नाही, आपल्या देशाची महानता आपण ओळखायला हवी. जाती-धर्मावरुन होणारे भेद दूर व्हायला हवेत. देशाच्या विकासासाठी तो एकमेव मार्ग आहे.’’
पुरस्कारार्थी डॉ. आशिष नंदा आणि मिलिंद कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील युवकांकडून येत्या काळात अनेक अपेक्षा असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासाच्यादृष्टीने केला पाहीजे असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: North India is the main part of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.