राज्यात परिचारिकांअभावी आरोग्यसेवेचा कणा खिळखिळा; 3 हजार 410 पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:00 AM2019-05-15T07:00:00+5:302019-05-15T07:00:02+5:30

शहरात एका रूग्णामागे तीन तर ग्रामीण भागात एका रूग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे. ..

no suffcient nurses in hospitals at maharashtra ; 3 thousand 410 posts vacant | राज्यात परिचारिकांअभावी आरोग्यसेवेचा कणा खिळखिळा; 3 हजार 410 पदे रिक्त

राज्यात परिचारिकांअभावी आरोग्यसेवेचा कणा खिळखिळा; 3 हजार 410 पदे रिक्त

Next
ठळक मुद्देसद्यस्थितीत शहरात एका परिचारिकेला 50 ते 60 रूग्णांची अथवा संपूर्ण वॉर्ड सांभाळावा लागतोय शासकीय रूग्णालयांमधील रूग्णांची वाढती संख्या पाहाता परिचारिका दुप्पट असणे आवश्यक वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्ये विभागात 12 हजार 44 मंजूर पदांपैकी 2 हजार 125 पदे रिक्त

पुणे : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रूग्णालयांमध्ये परिचारिकांच्या 25 हजार 274 मंजूर पदांपैकी 3 हजार 410 पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणा-या परिचारिकांवर या रिक्त पदांमुळे अतिरिक्त ताण येत आहे. पदे भरायचीच नाहीत किंवा भरली तरी ती अकरा महिने करारावर भरायची या शासनाच्या धोरणामुळे आरोग्यसेवेचा कणाच खिळखिळा झाला आहे. 
    इंडियन नर्सिंग कौन्सिलने(आयएनसी) शहर आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये किती परिचारिका असल्या पाहिजेत यासंदर्भातील प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात एका रूग्णामागे तीन तर ग्रामीण भागात एका रूग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे. मात्र या प्रमाणतेकडे दुर्लक्ष करीत सद्यस्थितीत शहरात एका परिचारिकेला 50 ते 60 रूग्णांची अथवा संपूर्ण वॉर्ड सांभाळावा लागत आहे. आयएनसीच्या प्रमाणाची अमंलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. सार्वजनिक आरोग्य सेवा विभागात अधिसेविका वर्ग 3, सहाय्यक अधिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका/निर्देशिका, शुश्रृषा अधिकारी/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, मनोरूग्ण तज्ञ परिचारिका, बालरूग्ण तज्ञ परिचारिका, परिसेविका, अधिपरिचारिका, एल.एच.व्ही आणि ए.एन.एम अशी अनेक पदे रिक्त आहेत. शासकीय रूग्णालयांमधील रूग्णांची वाढती संख्या पाहाता परिचारिका दुप्पट असणे आवश्यक आहे. मात्र नवीन परिचारिकांची भरती होत नाही आणि रिक्त पदेही भरली जात नसल्याने परिचारिकांवर अतिरिक्त ताण येत आहे. परिचारिकांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यातच आता सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदे भरली जात आहेत. मात्र रुग्णसेवा सुरळीतपणे चालू राहण्याकरीता परिस्थितीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्यात येतात, अशी माहिती महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर यांनी  लोकमत शी बोलताना दिली. सर्वात बिकट स्थिती ग्रामीण भागात आहे. सर्वच रूग्णांकडे परिचारिकांना लक्ष देणे शक्य होत नाही. गंभीर रूग्णांकडेच त्यांना लक्ष द्यावे लागते.  रिक्त पदांमुळे सामान्य रुग्णांना फटका सहन करावा लागतो. ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे.  अशा स्थितीत अनेक रुग्णालयांमध्ये परिचारिकांना रुग्णसेवेसाठी अधिक वेळ द्यावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
............
 वैद्यकीय शिक्षण विभाग प्राचार्य-प्राध्यापकांविना
राज्यातील मुंबई, औरंगावाद, यवतमाळ, चंद्रपूर अशा ज्या भागांमध्ये शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्ये विभागात 12 हजार 44 मंजूर पदांपैकी 2 हजार 125 पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये अधिक्षिका शुश्रृषा सेवा, प्राध्यापक प्राचार्य, प्राचार्य, प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक, व्याख्याता, सेविका वर्ग 2 श्रेणी 1, सेविका वर्ग 2 श्रेणी 2, सहाय्यक अधिसेविका, निर्देशिका, विभागीय परिसेविका, सेविका, आरोग्य परिसेविका, परिसेविका, रूग्ण परिसेविका आणि परिचारिका या पदांचा समावेश आहे.

.........
अत्यावश्यक पदे रिक्त
मनोरुग्ण तज्ज्ञ आणि बालरुग्ण परिचारिकांचे प्रमाण सर्वात कमी आहे. बालरुग्णांसाठीच्या १३४ पैकी ९० जागा तर मनोरुग्णांसाठीच्या १४७ पैकी थेट ८२ जागा रिक्त आहेत. शुश्रृषा अधिकाºयांची १६९ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात १२१ पदे भरलेली नाहीत. अश्ीच बिकट अवस्था सहाय्यक अधिसेविकांची आहे. मंजूर १३९ पदांपैकी ९२ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या ११ पैकी ७ पदे रिक्त आहेत. 

Web Title: no suffcient nurses in hospitals at maharashtra ; 3 thousand 410 posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.