नाशिक महामॅरेथॉन : ‘इथोपिया’चा लेमलू इमाटा तर महिलांमध्ये नेहा सोनवणे विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:45 PM2017-10-08T12:45:04+5:302017-10-08T13:03:15+5:30

गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरूष गटात  लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला

Neha Sonawane wins 'Ethiopia's Lemalu Imata' in Nashik Mahamarethon; | नाशिक महामॅरेथॉन : ‘इथोपिया’चा लेमलू इमाटा तर महिलांमध्ये नेहा सोनवणे विजेते

नाशिक महामॅरेथॉन : ‘इथोपिया’चा लेमलू इमाटा तर महिलांमध्ये नेहा सोनवणे विजेते

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी तृतीय क्रमांक राखला. २१ किलोमीटरसाठी खुल्या पुरूष गटात पिंटू यादव हा द्वितीय तर रमेश गवळी तृतीय आला. ज्येष्ठांच्या गटात कैलास माने यांनी प्रथम तर लक्ष्मण यादव यांनी द्वितीय क्रमांक राखला

नाशिक : उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात अन् ओसंडून वाहणाºया उत्साहामध्ये लोकमतच्या वतीने आयोजित नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो नाशिककरांसह महाराष्टÑातील विविध शहरांमधून तसेच गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरूष गटात  लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर ज्येष्ठांच्या महिला प्रवर्गात अर्जेंटिनाच्या लिना यांनी द्वितीय क्रमांक राखला.
२१ किलोमीटरसाठी खुल्या पुरूष गटात पिंटू यादव हा द्वितीय तर रमेश गवळी तृतीय आला. महिलांमध्ये श्वेता भिडे यांनी द्वितीय आणि निता नारंग यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच ज्येष्ठांच्या गटात कैलास माने यांनी प्रथम तर लक्ष्मण यादव यांनी द्वितीय क्रमांक राखला आणि महिलांमध्ये केल्लम्मा अल्फोन्सो यांनी प्रथम तर शीतल संघाई यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आणि जयश्री पटेल यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ गटात २१ किलोमीटरमध्ये दिलीप राठी प्रथम तर के.रामकृष्णन द्वितीय आणि नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी तृतीय क्रमांक राखला. महिलांमध्ये चंपाबेन व्यंकरिया प्रथम तर प्रितीका चौधरी या द्वितीय आल्या.


१० कि.मीमध्ये खुल्या पुरूष गटात अतुल चौधरी (प्रथम) तर महिला वर्गात पूजा शिरोडे यांनी बाजी मारली. तसेच १० कि.मीच्या गटात ज्येष्ठ प्रवर्गात पांडुरंग पाटील हे प्रथम तर विजय शिंपी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच जेष्ठ महिलांमध्ये शोभा देसाई प्रथम तर अर्जेंटिना लीना यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनाही पदक प्रदान करण्यात आले.

विजेत्या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता ललीत प्रभाकर, यांच्यासह लोकमत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, जीएम डायरेक्टर आशिष जैन, धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, संजिवनी जाधव, लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी.चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, दिपक बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक दिपक चंदे, ‘फ्रू टेक्स’चे नरेश गुप्ता, शैलेश गुप्ता जहागिरदार बेकर्सचे मिलिंद जहागीरदार, सपकाळ नॉलेज हबचे रविंद्र सपकाळ, सुला विनियार्डचे निरज अग्रवाल, फ्रावशी इंटरनॅशनलचे रतन लथ, संदीप युनिव्हर्ससिटीचे कुलगुरू एस. रामचंद्रन, संदीप कुलकर्णी, एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणॉय, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. अनुज तीवारी, सह्याद्री फूडचे क्षितिज अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक चांडक यांनी केले व आभार रुचिरा दर्डा यांनी मानले.

Web Title: Neha Sonawane wins 'Ethiopia's Lemalu Imata' in Nashik Mahamarethon;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.