बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 02:55 PM2018-12-22T14:55:56+5:302018-12-22T15:09:25+5:30

येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा.

needs super fast process of Bank merger : Nitin Gadkari | बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी 

बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी 

Next
ठळक मुद्देसरकारी मदत हा शेवटचा पर्यायकेंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूकदुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनसाखर कारखान्यांना कर्ज देऊ नका

पुणे : आर्थिक अडचणीतील बँका इतर सक्षम बँकांनी विलिनीकरण करुन घेतल्यास बँकिंग व्यवसाय सुरळीत होईल. अडचणीतील बँकेला सरकारने मदत करावी हा उपाय अगदी शेवटचा असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बँकांच्या विलिनीकरणावर भाष्य केले. 
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना बँकींग रत्न आणि सहकारी बँकींग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शीला काळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला.


गडकरी म्हणाले, येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा. एखादी चूक झाल्यास नागरीक जाब विचारतील. सहकार क्षेत्राविषयी लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण होईल हे पाहिले पाहीजे. आज एकही खाते अनुत्पादित (एनपीए) होणारच नाही, असे नाही. याचा अर्थ कोणा संचालकांनी चुकीचा व्यवहार करु नये. अशा संचालकांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सरसकट सर्व संचालकांना जबाबदार धरुन चालणार नाही. सहकारी बँकीग क्षेत्राने या पुढे व्यावसायिक दृष्टीकोन (प्रोफेशनल अ‍ॅप्रोच) ठेवून काम केले पाहीजे. 
‘राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका या एकाच प्रकारचे काम करतात. मात्र, केंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूक दिली जाते. राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्यास सरकार त्यांना पॅकेज देते. सहकारी बँकांना मात्र, अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडले जाते. केंद्र सरकारने सहकारी बँकांना किमान बँक गॅरंटीचा अधिकार द्यावा अशी मागणी सहकार मंत्री देशमुख यांनी केली. तसेच, दुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.  
--------------------
साखर कारखान्यांना कर्ज देऊ नका : गडकरी
पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने ७५ टक्के, मराठवाडा ६० टक्के आणि विदर्भातील कारखाने २५ टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांसारखे आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना कृपया कर्ज वितरण करु नका. मात्र, त्यांना उसापासून थेट इथेनॉल प्रकल्प उभारायचा असेल तर कर्ज वितरण नक्की करा, असा व्यावसायिक सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी बँकांना दिला. 

Web Title: needs super fast process of Bank merger : Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.