शरद पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, भाषणही रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 01:24 PM2019-02-22T13:24:37+5:302019-02-22T16:19:43+5:30

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे.

NCP workers protested in front of Sharad Pawar | शरद पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, भाषणही रोखले

शरद पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, भाषणही रोखले

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि घोषणाबाजी

फलटण - लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली त्यामुळे शरद पवार यांनाही आपले भाषण थांबवावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज ते या मतदारसंघात येणाऱ्या फलटण येथे आले होते. त्यावेळी जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यात आल्याने शेखर गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजीस सुरुवात केली. दरम्यान, शेखर गोरे स्टेजवर आले नाहीत. 

शरद पवार हे भाषणास उभे राहिल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. त्यामुळे त्यांना आपले भाषण थांबवावे लागले. या प्रकारामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आले. 

Web Title: NCP workers protested in front of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.