पुण्यात भरणार ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:11 AM2018-01-06T04:11:50+5:302018-01-06T04:12:03+5:30

पुण्यातील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तीन दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन केले आहे. अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल.

 National Teachers Congress in Pune | पुण्यात भरणार ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’  

पुण्यात भरणार ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’  

googlenewsNext

मुंबई - पुण्यातील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तीन दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन केले आहे. अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात १० ते १२ जानेवारीदरम्यान होणाºया या कार्यक्रमास देशातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ८ हजार शिक्षक उत्स्फूर्तपणे सामील होणार आहेत.
युनिव्हर्सिटीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्यचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडविण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिषदेचे चीफ पॅट्रन आहेत, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पॅट्रन आहेत.
पुण्याच्या मिटसॉम महाविद्यालयाचे प्रा. हेमंत भिसे यांनी सांगितले की, या तीन दिवसीय परिषदेत एकूण ७ सत्रे होतील. त्यात भारतातील उच्चशिक्षणाचा आढावा आणि भावी दिशा, उच्चशिक्षणाचे जागतिकीकरण करताना योजना आणि नियोजनसह अन्य विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करतील.

Web Title:  National Teachers Congress in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.