नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चाकूहल्ला करून लुटणा-या अल्पवयीन गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:46 PM2017-12-02T17:46:39+5:302017-12-02T17:50:50+5:30

nashik,three,minor,age,criminal,arrested | नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चाकूहल्ला करून लुटणा-या अल्पवयीन गुन्हेगारांना अटक

नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चाकूहल्ला करून लुटणा-या अल्पवयीन गुन्हेगारांना अटक

Next
ठळक मुद्देरात्रीच्या सुमारास एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्यावर चाकूने वार तिघा अल्पवयीन संशयित ताब्यात ; सहा गुन्ह्यांची कबुली

नाशिक : रात्रीच्या सुमारास एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्यावर चाकूने वार करून लूटल्यानंतर अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून पळ काढणा-या तिघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी (दि़०१) रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले़ शहरातील सहा जणांना विविध ठिकाणी चाकूने वार करून लुटल्याची कबुली या तिघांनी पोलिसांकडे दिली आहे़
शहरातील नाशिकरोड, उपनगर, मुंबईनाका, द्वारका, शरणपूररोड, पाथर्डी फाटा या ठिकाणी चाकूहल्ला करून लुटल्याच्या घटना घडल्या होत्या़ पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी हल्ला करून लूटण्याची पद्धत व दुचाकी यावरून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन्ही परिमंडळातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचा-यांना या टोळीचा शोध घेण्यास सांगितले होते़ सातपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी एस. आर. साळवे यांना या तिघांबाबत माहिती मिळाली होती़
गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिका-यांनी शुक्रवारी (दि़०१) मध्यरात्री सापळा रचून अ‍ॅक्टिवा (एमएच १५ ईटी २६५२) दुचाकीवरील तिघा अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले़ पोलिसांनी या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चांदीची चैन, चाकू, दुचाकी, रोख रक्कम असा सुमारे ६० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला़ त्यामुळे या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांची शहरात केलेल्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली़ चेहडी शिवारातील निसर्ग लॉन्स येथे २५ नोव्हेंबरला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टीवा दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी ज्ञानेश्वर कुमावत (१९, रा. चेहडी पपींग रोड) या युवकावर वार करून रोकड, चांदीचे चेन असा ऐवज लूटून नेला होता़
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याच दिवशी शहरातील विविध ठिकाणी याच पद्धतीने लुटीच्या घटना घडल्या होत्या़ दरम्यान, या तिन्ही अल्पवयीन संशयितांना नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी काही लूटीच्या घटना समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

Web Title: nashik,three,minor,age,criminal,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.