नागपूरच्या हवाला व्यापाऱ्यांनी पाठवले विदेशात दोन हजार कोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:45 AM2019-01-14T06:45:15+5:302019-01-14T06:45:29+5:30

ईडीच्या रडारवर; श्री रेणुकामाता मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीत अफरातफर

Nagpur: Two thousand crores sent by the traders of Nagpur to abroad? | नागपूरच्या हवाला व्यापाऱ्यांनी पाठवले विदेशात दोन हजार कोटी?

नागपूरच्या हवाला व्यापाऱ्यांनी पाठवले विदेशात दोन हजार कोटी?

Next

नागपूर : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात नागपूरच्या हवाला व्यापाºयांचे थेट कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नागपुरातील दोन हवाला व्यापाºयांना चौकशीसाठी बोलविल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक हवाला व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.


मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरच्या आधारे ईडीने सोसायटीचे माजी व्यवस्थापक मच्छिंद्र खाडे यांना अटक केली. त्यानंतर दोन हजार कोटींचे परकीय चलन विदेशात पाठविल्याच्या आरोपावरून ईडीने अनिल चोखारा, संजय जैन आणि सौरभ पंडित यांना अटक केली. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी विदेशात रक्कम पाठविण्यासाठी नागपूरच्या हवाला व्यापाºयांची मदत घेतल्याची चर्चा आहे. संबंधित हवाला व्यापाºयांना ईडीने चौकशीसाठी बोलावून घेतल्याची चर्चा सुरू झाल्याने व्यापाºयांना घाम फुटला आहे. विशेष म्हणजे, आर्थिक अफरातफरीचे मध्य भारतातील सर्वात मोठे केंद्र म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते.

सध्याचे पोलीस आयुक्त १० वर्षांपूर्वी नागपुरात गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त होते. त्यावेळी हवाला व्यापारी लखोटिया बंधूंकडून लाखोंची रोकड लुटण्यासाठी उत्तर प्रदेशातील कुख्यात बच्चाबाबूची टोळी नागपुरात आली होती. त्यांनी लखोटिया बंधूंची हत्या करून रोकड पळवून नेली होती. या हत्याकांडानंतर नागपुरातील हवाला व्यवसाय अधोरेखित झाला होता. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या संशयास्पद घडामोडी आणि कारवाईमुळे येथील हवाला व्यावसायिक पोलीस तसेच विशिष्ट दलाल आणि गुन्हेगारांच्या चांगल्या ओळखीचे झाले.
अनेक जण त्यांच्याकडून महिन्याला लाखो रुपये घेतात. या देण्या-घेण्याची फारशी चर्चा होत नाही.

तीन महिन्यांपूर्वी छत्तीसगडमधून आलेली हवालाची व्हॅन नंदनवन पोलीस ठाण्यातील एक एपीआय आणि दोन कर्मचाºयांनी त्यांच्या गुन्हेगार साथीदारांच्या मदतीने लुटली होती. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे एपीआय सोनवणे आणि दोन पोलीस तसेच त्यांचे गुन्हेगार साथीदार गजाआड झाले होते.

Web Title: Nagpur: Two thousand crores sent by the traders of Nagpur to abroad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.