धुळयातील रफियोद्दीन शेख खून खटल्यात एका आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:01 PM2017-07-22T14:01:20+5:302017-07-22T14:01:20+5:30

सागर साहेबराव पवार ऊर्फ कट्टी या आरोपीला पोलिसांनी शनिवारी पुणे जिल्ह्यातील कामशेत येथून अटक केली आहे.

In the murder case of Rafiuddin Sheikh, one of the accused arrested | धुळयातील रफियोद्दीन शेख खून खटल्यात एका आरोपीला अटक

धुळयातील रफियोद्दीन शेख खून खटल्यात एका आरोपीला अटक

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 22 - रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्या याच्या मंगळवारी झालेल्या खून प्रकरणातील फरार 10 आरोपीपैकी सागर साहेबराव पवार ऊर्फ कट्टी या आरोपीला पोलिसांनी  शनिवारी पुणे जिल्ह्यातील कामशेत येथून अटक केली आहे. 
 
दरम्यान शहरात या खुनाचे पडसाद   उमटत  आहे. शहरात शनिवारी  दुपारी साडे अकरा  वाजेच्या देवपुरातील सुशी नाल्याजवळ जमावाकडून झालेल्या दगडफेकित धुळे- शिंदखेड़ा बसच्या चालक कँबिनचा  काच फुटल्या. ततातडीने घटनास्थळी पोहचून  पोलिसानी जमाव पांगविल्याने परिस्थिति नियंत्रणात आली आहे.
 
मंगळवारी शहरातील कराचीवाला खुंट चौकात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रफियोद्दीन शफियोद्दीन शेखला गाठून त्याची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटली असून,  हा खून गोयर परिवारातील सदस्यांनी केल्याचा निष्पन्न झाल्याने रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयरसह आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील कराचीवाला खुंट चौकातील महापालिकेकडे जाणा-या पारोळा रोडवरील चहाच्या दुकानाजवळ पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास कुख्यात गुंड रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्या हा काळ्या रंगाच्या स्कुटरवर आला. याठिकाणी आधीच त्याची वाट  बसलेल्या  8 ते 10 जणाना  तो भेटला. याठिकाणी टोळीतील काही लोकांशी गुड्डयाचा वाद झाला. यावेळी टोळीतील एकाने अचानक त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि गोळी झाडली. 

आणखी वाचा 
शाहरूख, अजय देवगण व बच्चन परिवाराला ईडीची नोटीस
रिलायन्सच्या स्वस्त फोनमुळे मार्केटमध्ये खळबळ, मोबाईल कंपन्या चिंतेत
राहुल गांधीच्या मोदींवरील टीकेला स्मृती इराणींचं उत्तर
 
गोळी लागल्याने गुडय़ा जखमी झाला. दरम्यान, टोळीतील अन्य लोकांनी त्याच्यावर तलवार व चॉपरने सपासप वार केले. गंभीररित्या जखमी झाल्याने गुड्डया जमिनीवर कोसळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर हल्लेखोर आग्रारोडर्पयत पायी गेले. त्याठिकाणी उभ्या केलेल्या एका गाडीत बसून ते पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
 
रोज पहाटे मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना या घटनेमुळे धक्का बसला. भरचौकात अवघ्या काही मिनिटात घडलेला थरार पाहून स्तब्ध  झाल़े तर घटनेनंतर ही बातमी वा:यासारखी शहरात पसरल्याने  घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
याप्रकरणी शेख फारुक फत्तू फौजी (46) रा़ जामा मशिद, धुळे यांनी मंगळवारी धुळे शहर पोलिसात दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयर, विलास उर्फ छोटा पापा श्याम गोयर, भीमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, श्याम गोयर आणि अन्य तीन ते चार जण यांच्यावर संशय व्यक्त केला आह़े त्यांच्याविरुध्द भादंवि कलम 302, 504, 506, 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 
 
गुड्डयावर 35 गुन्हे दाखल होते
मयत गुड्डया याच्यावर धुळे शहरासह कोपरगाव व अन्य ठिकाणी वेगवेगळ्या कलमान्वये 35 गुन्हे दाखल आहेत. तो मनपा जळीतकांडातील प्रमुख संशयित आरोपी होता. त्या जळीतकांडापासूनच तो जास्त प्रकाशझोतात आला होता. त्याची शहरातील व्यापा-यांमध्येही दहशत होती.

Web Title: In the murder case of Rafiuddin Sheikh, one of the accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.