खासदार संभाजी छत्रपतींचे मोदींसह सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे फिटनेस चॅलेंज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 03:46 PM2018-05-25T15:46:33+5:302018-05-25T15:46:33+5:30

#HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने सुरु झालेल्या #FitnessChallenge मोहिमेत खासदार संभाजी छत्रपतींनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, पुशअप, चालणे वगैरेसारखे छोटे-मोठे चॅलेंज आरामात स्वीकारुन त्याचे व्हिडिओ आनंदाने पोस्ट करणाऱ्या या सर्वांसाठी छत्रपतींचे चॅलेंज स्वीकारणे अवघडच आहे. नव्हे हे फिटनेस चॅलेंज राजकारण्यांसाठी तर चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कारण ते चॅलेंज आहे...

MP Sambhaji Chatrapath Challenge to celebrities | खासदार संभाजी छत्रपतींचे मोदींसह सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे फिटनेस चॅलेंज 

खासदार संभाजी छत्रपतींचे मोदींसह सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे फिटनेस चॅलेंज 

Next

मुंबई - #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने सुरु झालेल्या #FitnessChallenge मोहिमेत खासदार संभाजी छत्रपतींनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. संभाजी छत्रपतींनी आपले फिटनेस चॅलेंज दिले आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगनसह आणखीही काही सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना. मात्र, पुशअप, चालणे वगैरेसारखे छोटे-मोठे चॅलेंज आरामात स्वीकारुन त्याचे व्हिडिओ आनंदाने पोस्ट करणाऱ्या या सर्वांसाठी छत्रपतींचे चॅलेंज स्वीकारणे अवघडच आहे. नव्हे हे फिटनेस चॅलेंज राजकारण्यांसाठी तर चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कारण ते चॅलेंज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनी राजधानी किल्ले रायगड पायी चढण्याचे!



 

माहिती प्रसारण, युवा, क्रीडा खात्यांचा कारभार पाहणारे केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी २२ मे रोजी #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने #FitnessChallenge मोहीम सुरु केली. त्यांनी ह्रतिक रोशन, विराट कोहली, सायना नेहवाल यांना आव्हान देत त्यांचे फिटनेस व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करण्यास सांगितले. त्यापैकी विराट कोहलीने तर आपला फिटनेस व्हिडिओ पोस्ट करत पुढे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपली पत्नी तसेच एम.एस.धोणी यांना आव्हान दिले. ट्विटरवर खूपच सक्रीय असलेल्या नरेंद्र मोदींनी आपले योगा करतानाचे फोटो पोस्ट करत आव्हानाला तोंड दिले. त्यानंतर ही मोहीम आणि #HumFitTohIndiaFit #FitnessChallenge हे हॅशटॅग चाँगलेच ट्रेंड झाले. 

मात्र, आता खासदार संभाजी छत्रपतींच्या ट्विटमुळे अनेकांची चांगलीच गोची झाली आहे. दरवर्षी ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी किल्ले रा.गडावर साजरा केला जातो. संभाजी छत्रपती स्वत: त्यासाठी सक्रीय पुढाकार घेतात. यावेळी त्यासोहळ्यासाठी स्वत: आणि शिवभक्तांचा पायी चालत रायगडावर जातानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याव्हिडिओसोबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड, किरण रिजिजू, काँग्रेस नेते ज्योतिर्रादित्य शिंदे, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगन, रितेश देशमुख यांनाही मेन्शन करत  आव्हान दिले आहे. पाच जून रोजी दुपारी तीन वाजता माझ्यासोबत किल्ले रायगडावर चला असे त्यांनी सुचवले आहे. हम फिट तो इंडिया फिट हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संभाजी छत्रपतींनी दिलेले हे फिटनेस चॅलेंज स्वीकारणे अनेकांसाठी सोपे नाही. पायथ्यापासून माथ्यापर्यंत पंधराशेपेक्षा जास्त पायऱ्या चढत किमान अडीच तासांचा पायी प्रवास करणे कितीजणांना भावेल हा अडचणीचाच मुद्दा. त्यामुळेच बहुधा आतापर्यंत तरी एकानेही त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. पुशअप, चालणे, योगा वगैरे करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या या ट्विटर सेलिब्रिटींपैकी एकानेही चॅलेंज स्वीकारल्याचे ट्विट केलेले नाही. त्यामुळेच संभाजी छत्रपतींचे हे फिटनेस चॅलेंज ट्विट सर्वांसाठीच अडचणीचे ठरल्याचे मानले जात आहे.



 

Web Title: MP Sambhaji Chatrapath Challenge to celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.