मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण : ‘ते’ एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:59 AM2019-02-06T01:59:34+5:302019-02-06T01:59:59+5:30

तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना येत होते.

Money deposited in the name of friend: 'To' for SMS shopping app publicity | मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण : ‘ते’ एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी

मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण : ‘ते’ एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी

Next

पुणे : तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना येत होते़ त्यामुळे आॅनलाईन फसवणुकीचा हा नवा प्रकार असल्याच्या संशयाने त्यावरील लिंक उघडून पाहू नका, असा इशारा देण्यात आला होता़ मात्र, हे एसएमएस एका शॉपिंग मोबाईल अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आल्याचे पुणे सायबर क्राईम सेलने केलेल्या तपासात आढळून आले आहे़
‘तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे’ सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़ ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच, एका कोड नंबर दिला होता़ हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़ त्यामुळे हा आॅनलाईन शॉपिंगचा प्रकार असावा, असे वाटून ही लिंक ओपन करू नका, असे सांगणारे एसएमएस त्याबरोबर पाठविले जाऊ लागले होते़ त्याची तक्रार पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे करण्यात आली होती़ सायबर सेलने याची सखोल तपासणी केल्यावर हे बल्क एसएमएस उत्तर प्रदेशातील बीएसएनएलच्या पश्चिम विभागातून येत असल्याचे दिसून आले़ त्यानुसार बीएसएनएलकडून सायबर सेलने माहिती घेतल्यावर दिल्लीतील एका कंपनीने हे बल्क एसएमएस पाठविण्याची सुविधा घेतली असल्याचे आढळून आले़ सायबर सेलने या कंपनीशी संपर्क साधला़ त्यानंतर शनिवारपासून आता हे एसएमएस येणे बंद झाले आहे़
दिल्लीच्या एका कंपनीने काढलेल्या नवी मोबाईल अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़ या कंपनीने हे काम दुसऱ्या एका कंपनीला दिले होते़ त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटींनी हे एसएमएस पाठविण्यात आले; त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़
या कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मोबाईल शॉपिंग अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविल्याचे सांगितले़ यावर कोणी संपर्क साधला, तर त्याने त्या अ‍ॅपवरून पुढील काळात काही खरेदी केली, तर त्याला त्याच्या बिलातही एक हजार रुपयांची रक्कम वळती केली जाणार होती़ मात्र, त्याचा सर्वांनी विपरीत अर्थ काढल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा समज निर्माण झाला़

या कंपनीच्या अधिकाºयांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे़ ते सांगतात तसाच त्यांचा हेतू होता का, याबाबत अधिक तपास करीत आहोत़ त्याचा काही गैर हेतू होता का, याची पडताळणी केली जात आहे़ - जयराम पायगुडे
पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम

मित्राने तुमच्या खात्यात
१ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना सातत्याने येत होते़

Web Title: Money deposited in the name of friend: 'To' for SMS shopping app publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.