ऑस्करवारी करुन मराठमोळा सनी पवार मुंबईत परतला

By admin | Published: March 1, 2017 09:44 AM2017-03-01T09:44:20+5:302017-03-01T14:23:06+5:30

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हॉलिवूडच्या ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार आज मुंबईत परतला आहे

Marathlon Sunny Pawar returned to Mumbai by Oscars | ऑस्करवारी करुन मराठमोळा सनी पवार मुंबईत परतला

ऑस्करवारी करुन मराठमोळा सनी पवार मुंबईत परतला

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हॉलिवूडच्या ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार आज मुंबईत परतला आहे. मुंबई विमानतळावर सनी पवारच्या कुटुंबिय आणि मित्रांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. ऑस्कर पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत ‘लायन’ चित्रपटही होता. सोशल मीडियावरही सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा सुरु होती. मात्र या चर्चेमागचं मुख्य कारण होता तो म्हणजे सनी पवार. तर दुसरीकडे चित्रपटासाठी भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल यालासुद्धा ऑस्करसाठीचे नामांकन मिळाले होते. 
 
‘लायन’च्या निमित्ताने देवसोबतच आणखी एक चेहरा चर्चेत आला तो म्हणजे सनी पवार. सनीने या सिनेमात देव पटेलच्या बालपणाची व्यक्तीरेखा साकारली आहे.गोल्डन ग्लोब आणि इतर पुरस्कार सोहळ्यांमध्येही सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. सनी हा मुंबईतल्या कलिना परिसरातील एका लहानशा घरात राहतो. मात्र त्याचं हे यश पाहून त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 
 
आपण ऑस्कर पुरस्कार सोहळा एन्जॉय केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी सनी पवारने दिली आहे. दरम्यान, सनी पवार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी 12 वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट घेणार आहे.
 

Web Title: Marathlon Sunny Pawar returned to Mumbai by Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.