मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 02:43 PM2018-11-29T14:43:06+5:302018-11-29T14:58:31+5:30

विधानसभेत आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर

maratha reservation bill passed in state legislative assembly community will get these benefits | मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार

मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार

googlenewsNext

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला. यानंतर सरकारनं आरक्षणाबद्दलचं विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडलं. या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक एकमतानं मंजूर झालं. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही निकषांवर मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगानं नोंदवला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे.




आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय मिळणार?
- शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण
- राज्याच्या लोकसेवांमधील पदांवर आणि प्रवेश नियुक्त्यांमध्ये 16 टक्के राखीव जागा
- विशेष प्रवर्ग तयार करुन मराठ्यांना आरक्षण 
- अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था, अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण
- राज्याच्या नियंत्रणाखालील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांमध्ये 16 टक्के आरक्षण

कृती अहवालातील महत्त्वाचे मुद्दे-
- ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण
- मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध
- 9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार फक्त उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना मिळणार आरक्षण

Web Title: maratha reservation bill passed in state legislative assembly community will get these benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.