“मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:06 PM2024-03-22T15:06:41+5:302024-03-22T15:07:18+5:30

Manoj Jarange Patil: ९० हजार ते एक लाख लोक सभेला होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी हा मोठा संकेत आहे. २४ तारखेला निर्णायक भूमिका घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil big allegation on cm and dcm | “मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार

“मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार

Manoj Jarange Patil: मला रात्री माहिती मिळाली की, माझ्याविरोधात आणखी १० ते १५ केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा. तडीपार करण्याचा प्रयत्न करायचा, क्लिप व्हायरल करायची. मराठा समाज विरोधात गेला आणि आता इतर समाजही विरोधात चालला आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केला.  

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सूचक संकेत दिले. गृहमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, ती म्हणजे तुम्ही जेवढे माझ्या विरोधात जाल, तेवढी लोक माझ्या बाजूने उभी राहतील. मला पाठिंबा देतील. एका बाजूला म्हणायचे की, गुन्हे मागे घेतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा गुन्हे दाखल करायचे. परळीसारख्या ठिकाणी ९० हजार ते एक लाख लोक सभेला होते. यावरून त्यांच्या लक्षात आले पाहिजे. हा तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणे कामाचे नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

सर्व मोठ्या जाती एकत्र आल्या तर राजकीय सुपडा साफ होईल

गृहमंत्री स्वतःला सर्वोच्च न्यायालयाच्या वर समजत असतील. ही सत्ता मराठ्यांनी दिली असली तरी मराठ्यांवरच अन्याय करू शकतो, असे त्यांना वाटत असेल. या सत्तेचा वापर करून मराठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. देशभरात मोठ्या जातींना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. पण जर सर्व मोठ्या जाती एकत्र आल्या तर यांचा राजकीय सुपडा साफ होईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, २४ तारखेला निर्णायक भूमिका घेणार आहे. १५ ते १६ विषय आहेत. गेल्या ७० वर्षांतील सगळ्या गोष्टी असणार आहेत. आतापर्यंत कुणी ऐकले नसतील, माहिती नसतील, असे विषय आहेत. 
 

Web Title: manoj jarange patil big allegation on cm and dcm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.