Mallikarjun Kharge has been appointed as Chairman of Co-ordination Committee | महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे 
महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडूनमहाराष्ट्रात समित्या जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

याचबरोबर, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे प्रचार समितीच्या प्रमुखपदाची धुरा सोपविली आहे. तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 


याशिवाय, कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीचे प्रमुखपद दिले आहे. तर प्रसिद्धी, प्रकाशन समितीचे प्रमुख म्हणून रत्नाकर महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


Web Title: Mallikarjun Kharge has been appointed as Chairman of Co-ordination Committee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.