Makar Sankranti 2018: What should you donate according to your horoscope | Makar Sankranti 2018 : मकर संक्रांतीला राशीनुसार या वस्तूंचे करा दान
Makar Sankranti 2018 : मकर संक्रांतीला राशीनुसार या वस्तूंचे करा दान

मुंबई - जीवनातील अडीअडचणी,  रुसवेफुगवे विसरून गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश मकर संक्रांतीचा सण देतो. यावर्षी शके १९३९ ची मकर संक्रांत दि. १४ जानेवारी २०१८ रोजी साजरी होत आहे. संक्रांतीच्या सणादिवशी दानाला महत्त्व आहे. संक्रांतीच्या काळात गोग्रास, भोजनाने भरलेले पात्र, नवीन भांडे, तूप, सोने, श्रीफळ, हळदी-कुंकू, कपडे तीळाचे लाडू अशा वस्तूंचे दान केल्यास शुभ फळ प्राप्त होऊ शकते. तसेच संक्रांती दिवशी राशीनुसार दान केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते.

संक्रांतीच्या काळात राशीनुसार दान करावयाच्या वस्तू पुढीलप्रमाणे -

मेष - मेष राशीच्या व्यक्तींनी गुळ, शेंगदाणे आणि तीळ या वस्तूंचे दान करावे.

वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींनी दही, तीळ, सफेद वस्त्र यांचे दान करावे.

मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींनी  तांदूळ, धान्य, मुगाची डाळ, पांघरूण यांचे दान करावे.

कर्क - कर्क राशीच्या व्यक्तींनी पांढरे तीळ, तांदूळ, चांदीचे दागिने यांचे दान करावे.

सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींनी तांबे, गहू आणि सोने यांचे दान करावे.

कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरवे वस्र, खिचडी आदी वस्तूंचे दान करावे.

तूळ - तूळ राशीच्या व्यक्तींनी साखर, पांघरुण, पांढरे हिरे अशा वस्तू दान म्हणून द्याव्यात.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीळ, लाल वस्र यांचे दान करावे.

धनू - धनू राशीच्या व्यक्तींनी हळकुंड,  पिवळे वस्र, सोन्याचा मोती इत्यादींचे दान करावे.

मकर - मकर राशीच्या व्यक्तींनी काळे तीळ, तेल यांचे दान करावे.

कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्तींनी तीळ, खिचडी, काळे वस्र यांचे दान करावे.

मीन - मीन राशीच्या व्यक्तींनी चणा डाळ, तांदूळ, तीळ आणि रेशमी वस्त्र यांचे दान करावे.
 


Web Title: Makar Sankranti 2018: What should you donate according to your horoscope
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.