मॉन्सून दोन दिवसात महाराष्ट्र व्यापणार मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या नशिबी विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 08:27 PM2019-06-22T20:27:27+5:302019-06-22T20:33:57+5:30

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़. 

Maharashtra will occupy two days by Monsoon, but Western Maharashtra will remain dry | मॉन्सून दोन दिवसात महाराष्ट्र व्यापणार मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या नशिबी विलंब

मॉन्सून दोन दिवसात महाराष्ट्र व्यापणार मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या नशिबी विलंब

पुणे : नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़.  येत्या दोन दिवसात मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता असून कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.  
मॉन्सून शनिवारी रत्नागिरी, सोलापूर, अदिलाबाद, ब्रम्हपूरी, पेद्रा, वाराणसी, गोरखपूर या ठिकाणापर्यंत आला आहे़.  येत्या २ ते ३ दिवसात कोकणातील उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशात पोहचण्याच्या दृष्टीने अनुकुल वातावरण आहे़.  
गेल्या २४ तासात काणकोण १३०, दाभोलीम १००, मार्मागोवा, संगमेश्वर, देवरुख ७०, दोडामार्ग ६०, मालवण ५०, सावंतवाडी ४०, पेरनेम, केपे २०, लांजा, राजापूर, रामेश्वरवागरी, वैभववाडी १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ मध्य महाराष्ट्रातील गडहिंग्लज ३०, बार्शी, गारगोटी, खटाव, वडुज २०, जामखेड, शिरोळ, सोलापूर, वाई १० मिमी तसेच मराठवाड्यात अंबड ६०, धारुर, जिंतूर ५०, माजलगाव, परळी वैजनाथ ४०, निलंगा, तुळजापूर, उमरी ३०, औसा, देवणी, हिमायतनगर, केज, कळंब, नायगांव, खैराव, सेलू, उमरगा २० अंबेजोगाई, मोमिनाबाद, अर्धपूर, घनसावंगी, पाथरी, रेणापूर, शिरुर अनंतपाल १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात अमरावती २०, चांदूर बाजार, पातूर, सिंधखेडराजा येथे १० मिमी पाऊस पडला़.  
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकण, मराठवाड्यात आज चांगला पाऊस झाला़. हा पाऊस अजून दोन दिवस मिळणार आहे़. २४ जूनपर्यंत संपूर्ण राज्य मॉन्सून व्यापण्याची शक्यता असून विदर्भातही २४ पासून पावसाला सुरुवात होईल़. २५ जूननंतर पाऊस कमी होण्याची शक्यता असून २६ जूनला कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़ त्यानंतर काही दिवस ब्रेक येण्याची शक्यता आहे़.  त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे़.  


इशारा : २३ जून रोजी कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ २४ व २६ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़.  

  • रविवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. 

 

  • रत्नागिरीला २४ व २६ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ व २६ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. 

 

  • पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसात मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही़. 

 

  •  पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसात मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही़.  

Web Title: Maharashtra will occupy two days by Monsoon, but Western Maharashtra will remain dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.