Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 04:58 PM2019-02-27T16:58:49+5:302019-02-27T17:40:16+5:30

मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2019: Foreign direct investment of 3 lakh 36 thousand crores in the state | Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक

Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक

Next
ठळक मुद्देआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला.मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याशिवाय, प्रस्तावित 42 माहिती तंत्रज्ञ उद्यानांतून 1 हजार 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात  1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


याचबरोबर, इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत 18 प्रकल्प प्रगती पथावर आहेत. यासाठी 6 हजार 300 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यातून 12 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले. 



 




 

Web Title: Maharashtra Budget 2019: Foreign direct investment of 3 lakh 36 thousand crores in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.