विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:06 PM2019-07-17T13:06:58+5:302019-07-17T13:08:04+5:30

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

Madhya Pradesh, Rajasthan assembly result repeat in Maharashtra Vidhan Sabha; Congress leaders confidence | विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. परंतु, केंद्रात जरी मोदींना संधी दिली असली तरी राज्यात आघाडीचं सरकार येईल, किंबाहुना मध्यप्रदेश आणि राजस्थानची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात होईल, अशी आशा आघाडीच्या नेत्यांना आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा मुद्दावर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन करताना सत्ता काबीज केली. तीनही राज्यात एकाचवेळी सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु, त्याचा फारसा उपयोग लोकसभा निवडणुकीत झाला नाही. जनतेचा कल राज्यात जरी काँग्रेसकडे असला तरी देशात मोदी सरकारवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत देखील हाच सूर होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली. यावरून महाराष्ट्रातील जनतेने केंद्रीतील मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. मात्र राज्याच्या बाबतीत स्थिती वेगळी आहे. राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

दरम्यान असं झाल्यास विद्यामान सरकारला मोठा धोका आहे. भाजप-शिवसेना युतीचे राज्यात सरकार असून भाजप राज्यात सुसाट आहे. त्यामुळे राज्यात एवढ्या सहजतेने सत्तांतर होईल, याची शक्यता कमीच असल्याचे जाणकरांचे मत आहे.

 

Web Title: Madhya Pradesh, Rajasthan assembly result repeat in Maharashtra Vidhan Sabha; Congress leaders confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.