OMPEGचा पहिला वर्धापनदिन रंगला लॉर्डसवर

By Admin | Published: May 6, 2017 02:28 PM2017-05-06T14:28:08+5:302017-05-06T14:40:51+5:30

यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन केली

Lord's is the first anniversary of OMPEG's color | OMPEGचा पहिला वर्धापनदिन रंगला लॉर्डसवर

OMPEGचा पहिला वर्धापनदिन रंगला लॉर्डसवर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत/केदार लेले 
लंडन, दि. 6 - यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन केली.OMPEG (Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group) या संस्थेचा उद्घाटन सोहळा १० एप्रिल २०१६ रोजी लंडन येथिल सडबरी गोल्फ क्लबवर संपन्न झाला होता. या संस्थेचा पहिला वर्धापनदिन (दि. 29 एप्रिल रोजी) लॉर्डसवर साजरा करण्यात आला.
 
प्रतिष्ठित लॉर्डसवर पहिला वर्धापनदिन साजरा! 
माजी क्रिकेटपटू व आर्थिक सल्लागार, श्री मधु गुप्ते मेरिलबोन क्रिकेट क्लबचे सदस्य असल्यामुळे पहिला वर्धापन दिन आणि चर्चासत्रासाठी लॉर्डसचे प्रतिष्ठित स्थळ निश्चित करण्यात त्यांचा मोठा हातभार लाभला!
या समारंभात श्री. उदय ढोलकिया, श्री. मिलिंद कांगले, श्री. जसबीर सिंग परमार आणि श्री. बनेश प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
युकेमधील विविध भागातून आलेल्या अनेक महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांनी या समारंभात हजर राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला!
 
सूत्र संचालन 
OMPEG या संस्थेचे संस्थापक सभासद - श्री अनिरुद्ध कापरेकर, श्री सुशील रापतवार, श्री जय तहसीलदार, श्री. अथर्व टिल्लू, श्री रविंद्र गाडगीळ आणि श्री दिलीप आमडेकर - या सर्वांनी पहिल्या वर्धापन सोहळ्याचे संचालन केले. तसेच या सोहळ्याचं चित्रिकरण आणि प्रक्षेपण श्री. डॉ. विजेंद्र इंगळे यांनी केले.
 
पहिला वर्धापनदिन आणि अनेक योगायोग! 
माननीय श्री. उदय ढोलकिया यांनी OMPEGला गणपतीची प्रतिमा भेट दिली. आणि तिथपासून अनेक योगायोगांचा उलगडा श्री. अनिरुद्ध कापरेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून केला. ते योगायोग असे  
१. गणपतीबद्दल मराठी माणसांत नांदणारी श्रद्धा ही उपजतच असते. गणपती आणि मराठी माणूस यांचा स्नेहबंध अगदी पुरातन काळापासून आजवर अबाधित राहिलेला आहे!   
२. OMPEGचा उद्घाटन सोहळा (सडबरी गोल्फ क्लब) आणि पहिला वर्धापन दिन (लॉर्डस क्रिकेट मैदानावर) म्हणजेच क्रीडाशेत्राच्या छायेत झाला.  
३. ही दोन्ही प्रतिष्ठित स्थळ निश्चित करण्यात माजी क्रिकेटपटू व आर्थिक सल्लागार, श्री मधु गुप्ते यांचा मोठा हातभार लाभला!
 
प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन 
रंगलेल्या चर्चासत्रात, मा. श्री. उदय ढोलकिया, मा. श्री. मिलिंद कांगले, मा. श्री. जसबीर सिंग परमार आणि मा. श्री. बनेश प्रभू यांनी आपल्या भाषणातून उपस्थित महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांना मौलिक मार्गदर्शन केले. 
 
OMPEG ऑनर्स पुरस्कार
श्री. राजीव बेनोडेकर, श्री. राजन शेगुंशी, सौ. मानसी बर्वे, श्री. प्रणव देव, श्री. अभय जोशी, श्री. राहुल घोलप, श्री. मनोज वसईकर आणि श्री. मनोज कारखानीस यांना त्यांच्या योगदानाबद्दल OMPEG ऑनर्स ने पुरस्कृत करण्यात आले.
 
कार्यक्रमाची  सांगता
श्री. राजन शेगुंशी, श्री. राजेंद्र देवकर आणि मयुरा चांदेकर यांनी त्यांच्या सुरेल गायकीने उपस्थित व्यावसायिक व उद्योजकांना मंत्रमुग्ध केले. २०-२५ मिनिटांचा कार्यक्रम बघताना अनेक जणांचे मन भूतकाळात रमले आणि अनेकांच्या ओठी जुने-नवे स्वर आणि गीते रुंजी घालू लागले. या कार्यक्रमाची  सांगता होण्यापूर्वी उपस्थित व्यावसायिक व उद्योजकांनी, प्रतिष्ठित लॉर्डस क्रिकेट ग्राउंडच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट टीमने आयोजित केलेल्या उत्तम जेवणाचा आस्वाद घेतला!
 
OMPEGची भावी उद्दिष्टे
संस्थापकांनी OMPEGला 2020 पर्यंत 20 नवीन उपक्रम किंवा प्रकल्प सुरू करण्याचे लक्ष्य दिले आहे. पहिल्याच वर्षी त्यापैकी तीन-चार उपक्रम हाती घेऊन, त्या दिशेने पाऊले सुद्धा उचलली आहेत.
 
पहिल्या वर्षातील उपक्रम
OMPEGने स्थानिक पातळीवरील उद्योजकांना मंच उपलब्ध करून दिला आहे. जे उद्योजक सेवा प्रदान करणार होते त्यांच्यासाठी लंडन मध्ये प्रदर्शन मेळावा आयोजित करून संधी उपलब्ध करुन दिली. मिल्टन कीन्स सारख्या प्रादेशिक शाखांनी अनिवासी भारतीय समाजाच्या विशिष्ट गरजांवर भाष्य करणारे तीन कार्यक्रम आयोजित केले.
 
तज्ञ विनिता देशपांडे, रंजिता दळवी, शिवानी प्रभुणे आणि अक्षय शहा यांनी अनुक्रमे वारसा हक्कपत्र, अर्थ आणि वित्त व्यवस्थापन, कर योजना यावरील चर्चासत्रात त्यांचे विचार मांडले आणि योग्य सल्ले दिले. 
 
यासारखे आणखी कार्यक्रम मिल्टन कीन्स आणि इतर शहरांत 2017 साली आयोजित करण्याची योजना आखली आहे. लंडन शहर सर्वदूर पसरले असल्यामुळे एक वेबिनार देखील आयोजित करण्यात आले आणि त्यात 20 पेक्षा अधिक सदस्यांनी उपस्थिती लावली.
 
संचालन आणि कार्यकर्ते : श्री अनिरुद्ध कापरेकर, श्री सुशील रापतवार व श्री जय तहसीलदार, श्री. अथर्व टिल्लू, श्री रविंद्र गाडगीळ, श्री दिलीप आमडेकर आणि श्री. अमरीश जोईजोडे
छायांकन: सौ. मानसी बर्वे, डॉ. विजेंद्र इंगळे  
 
 
प्लॅटिनम
श्री. अक्षय शहा - एस अकाऊंट्स अँड टॅक्स
श्री. देवांग गांधी – डेटामॅटिक्स
श्री. जय तहसीलदार - मर्क्युरिअस आयटी
सौ. माधवी आमडेकर आणि श्री. रवी गाडगीळ - कोलंबस इंटरनॅशनल
श्री. मनोज कारखानिस - डेसिमल फॅक्टर्स
 
गोल्ड
श्री. अनिरुद्ध कापरेकर - बॅनियन ट्री आन्सर्स
श्री. राहुल इथापे - नक्षी.कॉम
श्री. सुजय सोहनी आणि श्री. सुबोध जोशी - श्रीकृष्ण वडा पाव
 
सिल्व्हर
श्री. अभय जोशी - एलिफंट कनेक्ट
सौ. मंजिरी गोखले जोशी – मायाकेअर
श्री. दिपेश शहा – उकनोव्हा
सौ. मीना पंडितराव - मिल्स फ्लोरा
श्री. नयन गाला – एल.के. हाऊसिंग
श्री. प्रसाद कुलकर्णी - पंडित युके
श्री. राहुल घोलप - बेस्ट चॉईस ट्रॅव्हल्स
रंजिता दळवी / शिवानी प्रभुणे - दळवी वेल्थ मॅनेजमेंट
रेणुका फडके - व्ही आर मॉर्टगेज सोल्युशन्स
श्री. सचिन कदम - अर्घ्या एंटरप्राईझेस
श्री. सौजन्य – ट्रॅफिस
सौ. श्वेता मंत्री - फॅशन हेरिटेज / बानी
 

Web Title: Lord's is the first anniversary of OMPEG's color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.