पक्षात संशयास्पद वातावरण तयार करणाऱ्यांचा शोध घेऊ : संजय पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:20 AM2019-03-10T06:20:01+5:302019-03-10T06:20:22+5:30

सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ्या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे भाजपा खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Look for those who create suspicious atmosphere in the party: Sanjay Patil | पक्षात संशयास्पद वातावरण तयार करणाऱ्यांचा शोध घेऊ : संजय पाटील

पक्षात संशयास्पद वातावरण तयार करणाऱ्यांचा शोध घेऊ : संजय पाटील

googlenewsNext

सांगली : पक्षातीलच काहीजण माझ्याविषयी जाणीवपूर्वक संशयास्पद वातावरण निर्माण करीत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ्या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे भाजपा खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाटील म्हणाले की, भाजपमध्ये गटबाजी नाही, मात्र काहीजण संशयास्पद वातावरण तयार करत आहेत, ही गोष्ट खरी आहे. आम्ही त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊ. आमदार सुरेश खाडे यांनी कोणतेही गैर वक्तव्य केलेले नाही. कोणाचीच उमेदवारी निश्चित नसल्याने त्याबद्दल ठामपणे सांगणे योग्य नाही. खाडे यांनी केलेले वक्तव्य आकसबुद्धीतून नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी बऱ्याचदा जाहीर सभांमध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी, त्यांना तो अधिकार आहे, पण स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या गोष्टी जाहीर करता येत नाहीत. पक्षाकडे मी रितसर उमेदवारीची मागणी केली आहे. माझे पाच वर्षातील काम चांगले असल्याने मी तसा दावा केला आहे. माझ्यासह अनेकजण खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात. लोकशाही मार्गाने त्यांनी उमेदवारी मागणे यात गैर काही नाही. सर्वच पक्षातील लोकांशी माझे चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा पक्षाला मतांच्या माध्यमातून होऊ शकतो.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माझे अधिक लक्ष असल्याबद्दल चर्चा होत असली तरी, सर्वत्रच माझा संपर्क आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या जनतेने माझ्या राजकीय जडणघडणीत मोठी साथ दिली आहे. त्यामुळे या भागाविषयी प्रेम असणे स्वाभाविक आहे. राजकीय पेरणी म्हणून तेथे मी कधीही लक्ष घातलेले नाही. त्यामुळे त्याअर्थाने कोणी येथील कामांकडे पाहू नये.

अजितराव घोरपडेंशी चर्चा
अजितराव घोरपडे भाजपचेच आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षाबद्दलच्या नाराजीची चर्चाही चुकीची आहे. काही दिवसांपूर्वीच आम्हा दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. त्यामुळे ते वेगळी राजकीय भूमिका घेत असल्याबद्दलची चर्चा चुकीची आहे, असे संजय पाटील म्हणाले.

गर्भगळीत होणारा कार्यकर्ता नाही!
पक्षांतर्गत कोण काय म्हणत असतो, कोणत्या चर्चा पसरविल्या जात असतात, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. मी अशामुळे गर्भगळीत होणारा कार्यकर्ता नाही. विकासकामांच्या माध्यमातून माझे नाणे खणखणीत आहे. त्याच जोरावर मी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे, असे संजय पाटील म्हणाले.

Web Title: Look for those who create suspicious atmosphere in the party: Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.