भाजपने मला बारामतीत थांबूच दिले नाही; शरद पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:01 PM2019-04-23T17:01:11+5:302019-04-23T17:02:34+5:30

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर आपल्याला बारामतीत थांबूच दिले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Lok Sabha Election 2019 BJP did not stop me in Baramati SAYS Sharad Pawar | भाजपने मला बारामतीत थांबूच दिले नाही; शरद पवारांचा खुलासा

भाजपने मला बारामतीत थांबूच दिले नाही; शरद पवारांचा खुलासा

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना धक्कादायक खुलासा केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर आपल्याला बारामतीत थांबूच दिले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार सध्या हैदराबाद येथे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबतच्या बैठकीत उपस्थित आहेत.

प्रचार संपल्यानंतर मी बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली. बारामतीत सभेनंतर माझा काही कार्यक्रम नव्हता. पण बारामतीमध्ये माझे घर आहे, शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू दिले गेले नाही. माझे मतदान मुंबईत आहे, हे सर्वांना माहीत आहे, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून सत्ताधाऱ्यांकडून मतदार प्रक्रियेवर परिणाम करण्याची भीती व्यक्त केली. 'मी अनेक मतदारसंघात फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते, असं पवार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 BJP did not stop me in Baramati SAYS Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.