अभय बंग यांना जनसेवा पुरस्कार

By admin | Published: February 23, 2017 04:14 AM2017-02-23T04:14:15+5:302017-02-23T04:14:15+5:30

‘श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट’च्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा

Jansewa Award for Abhay Bang | अभय बंग यांना जनसेवा पुरस्कार

अभय बंग यांना जनसेवा पुरस्कार

Next

सांगली : ‘श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट’च्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शोधग्राम संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी बुधवारी त्याची घोषणा केली. येत्या मंगळवारी दुपारी चार वाजता येथील राजमती भवन येथे बंग यांना हा पुस्कार प्रदान केला जाणार आहे. रुग्णांना मदत करणाऱ्या दानोळी (ता. शिरोळ) येथील सुकुमार पाटील यांना विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्था, साताऱ्याचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदान होणार आहे. २१ हजार रुपये रोख व मानपत्र, सन्माचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jansewa Award for Abhay Bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.