देशभरातील शाळांची माहिती लवकरच होणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:58 AM2019-04-21T04:58:31+5:302019-04-21T04:58:59+5:30

यु-डायस प्लस; १५ मेपर्यंत डाटा अपटेड करण्याचे आदेश

Information about schools across the country will be available soon online | देशभरातील शाळांची माहिती लवकरच होणार ऑनलाइन

देशभरातील शाळांची माहिती लवकरच होणार ऑनलाइन

Next

- अविनाश साबापुरे 

यवतमाळ : देशभरातील १५ लाख शाळांची इत्यंभूत माहिती लवकरच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक शाळेची माहिती यु-डायस प्लस या पोर्टलवर संगणकीकृत करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक शाळा या पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेला शासनाची मान्यता नसेल तरीही त्या शाळेची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे. शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी आजपर्यंत यु-डायसवरील आकडेवारी विचारात घेतली जात होती. मात्र आता मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत काम करणाºया दिल्ली येथील नॅशनल इन्फरमेटिक सेंटरने यु-डायस प्लस हे पोर्टल विकसित केले आहे. त्यावर सर्व शाळांची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी शाळा पातळीवरील कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आली आहे.

पुढील महिन्यात २०१९-२० या सत्रातील योजनांचे समग्र शिक्षा अभियानाचे अंदाजपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अंदाजपत्रकासाठी २०१८-१९ या सत्रातील पटसंख्या व अन्य आकडेवारी गृहित धरली जाणार आहे. मात्र ही आकडेवारी यु-डायस प्लस पोर्टलवरुन घेतली जाणार आहे. त्यामुळे पोर्टलवर १५ मेपर्यंत माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महाराष्टÑात पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या जवळपास एक लाख नऊ हजार शाळा आहेत. त्या प्रत्येक शाळेची भौतिक सोई-सुविधांसह, कर्मचारी वर्ग व पटसंख्या अशी इत्यंभूत माहिती भरली जाणार आहे. त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.

यु-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिनही करून दिले आहे. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशा विविध पातळ्यांवर माहिती तपासूनच अंतिम केली जाणार आहे. विविध शिष्यवृत्त्या, मध्यान्ह भोजन योजना व इतर योजनांसाठी ही माहिती वापरली जाणार आहे.
- डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.

Web Title: Information about schools across the country will be available soon online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.