इल्याराजा, गुलाम मुस्तफा खान 'पद्मविभूषण' , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 06:36 AM2018-01-26T06:36:58+5:302018-01-26T06:38:58+5:30

दक्षिणेकडील थोर संगीतकार गणतेशिकन ऊर्फ इल्याराजा, रामपूर साहसवन घराण्याचे ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि केरळमधील ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ परमेश्वरन यांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.

Ilyaaraaja, Ghulam Mustafa Khan 'Padma Vibhushan', 11 Honors in the 'Padma' Award | इल्याराजा, गुलाम मुस्तफा खान 'पद्मविभूषण' , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

इल्याराजा, गुलाम मुस्तफा खान 'पद्मविभूषण' , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

googlenewsNext

नवी दिल्ली : दक्षिणेकडील थोर संगीतकार गणतेशिकन ऊर्फ इल्याराजा, रामपूर साहसवन घराण्याचे ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
गुलाम मुस्तफा खान आणि केरळमधील ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ परमेश्वरन यांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. त्यात ११ मानकरी महाराष्ट्रातील आहेत. तिघांना ‘पद्मविभूषण’, नऊ जणांना ‘पद्मभूषण’ व ७३ जणांना ‘पद्मश्री’ जाहीर झाली. आॅनलाइन पद्धतीने आलेल्या ३५ हजार नामांकनांमधून हे विजेते निवडले गेले. प्रसिद्धी आणि सन्मान यापासून दूर राहून इतरांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-यांना सन्मानित करणे सरकारने गेल्या वर्षीपासून सुरू केले. त्यानुसार यंदा २२ जणांचा ‘पद्मश्री’ने सन्मान करण्यात आला.
‘पद्मभूषण’ मानक-यांमध्ये बिलियर्डस व स्नूकरचे विश्वविजेते खेळाडू पंकज आडवाणी, ख्रिश्चन धर्मगुरू फिलिपोस मार च्रिसोत्तम, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी व रशियाचे भारतातील दिवंगत राजदूत अ‍ॅलेक्झांडर कडाकिन, तमिळनाडूतील शास्त्रज्ञ रामचंद्रन नागस्वामी, अमेरिकेत वास्तव्य करणारे साहित्यिक वेद प्रकाश नंदा, चित्रकार लक्ष्ण पै, ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.
पद्मभूषण पुरस्कार विजेते-
पंकज अडवाणी (बिलियर्डस खेळाडू), फिलीपोस मार ख्रिसोस्तोम (अध्यात्म), महेंद्रसिंग धोनी (क्रिकेटपटू), अलेक्झांडर कडाकिन (पब्लिक अफेअर्स), रामचंद्रन नागस्वामी (पुरातत्वशास्त्र), वेदप्रकाश नंदा (साहित्य व शिक्षण), लक्ष्मण पै (चित्रकला), अरविंद पारिख (संगीत), शारदा सिन्हा (संगीत)
पद्मश्री पुरस्कार विजेते
डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग (वैद्यकीय क्षेत्र), दामोदर गणेश बापट (समाजसेवा), प्रफुल्ल गोविंद बरुआ (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), मोहनस्वरुप भाटिया (लोकनृत्य), सुधांशू विश्वास (समाजसेवा), साईकोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पंडित श्यामलाल चतुर्वेदी (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), जोस मा जोय (विदेशी नागरिक - व्यापार व उद्योग), लंग्पोक्लकपम सुबदानी देवी (विणकर), सोमदेव देवरामन (टेनिस खेळाडू), येशी धोडेन (वैद्यकीय क्षेत्र), अरुपकुमार दत्ता (साहित्य व शिक्षण), दोद्दारंगे गौडा (गीतकार), अरविंद गुप्ता (शिक्षण व साहित्य), दिगंबर हांडसा (साहित्य व शिक्षण), रामली बिन इब्राहिम (विदेशी नागरिक - नृत्य), अन्वर जलालपुरी (मरणोत्तर, क्षेत्र - साहित्य व शिक्षण), पियाँग तेमजेन जमीर (साहित्य व शिक्षण), सीतव्वा जोड्डाती (समाजसेवा), मालती जोशी (साहित्य व शिक्षण), मनोज जोशी (अभिनेता), रामेश्वरलाल काब्रा (व्यापार आणि उद्योग), प्राणकिशोर कौल (कला), बौनलप केओकांगना (विदेशी नागरिक - वास्तुविशारद), विजय किचलू (संगीत), टॉमि कोह (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), लक्ष्मी कुट्टी (वैद्यकीय सेवा), जयश्री गोस्वामी महंता (साहित्य व शिक्षण), नारायणदास महाराज (अध्यात्म), प्रवकार महाराणा (शिल्पकार), हून मेनी (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), नौफ मारवाई (योगशास्त्र), झवेरीलाल मेहता (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), कृष्णाबिहारी मिश्रा (साहित्य व शिक्षण), शिशिर पुरुषोत्तम मिश्रा (चित्रपट), सुभाषिनी मिस्त्री (समाजसेवा), तोमिओ मिझोकामी (विदेशी नागरिक - साहित्य आणि शिक्षण), सोमदेत फ्रा महा मुनीवाँग (विदेशी नागरिक - अध्यात्म), केशवराव मुसळगावकर (साहित्य आणि शिक्षण), डॉ. थान्ट मिन्ट (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), व्ही नानामल (योगशास्त्र), सुलागिट्टी नरसम्मा (समाजसेवा), विजयालक्ष्मी नवनीत कृष्णन (लोकसंगीत), आय न्योमन नोत्रा (विदेशी नागरिक - शिल्पकार), मलाई हाजी अब्दुल्ला बिन मलाई हाजी ओथमान (विदेशी नागरिक - समाजसेवा), गोवर्धन पणिका (विणकर), भवानीचरण पटनाईक (पब्लिक अफेअर्स), मुरलीकांत पेठकर (दिव्यांग जलतरणपटू), हबीबुल्लो राजाबोव्ह (विदेशी नागरिक - साहित्य, शिक्षण), एम. आर. राजगोपाल (वैद्यकीय), संपत रामटेके (समाजसेवा, मरणोत्तर), चंद्रशेखर रथ (साहित्य व शिक्षण), एस. एस. राठोड (नागरी सेवा), अमिताव रॉय (विज्ञान आणि अभियांत्रिकी), संदूक रुइत
(विदेशी नागरिक - वैद्यकीय),
आर. सत्यनारायण (संगीत),
पंकज एम. शहा (वैद्यकीय),
भज्जू श्याम (चित्रकला), महाराव रघुवीरसिंग (साहित्य आणि
शिक्षण), किदंबी श्रीकांत (बॅडमिंटन), इब्राहिम सुतार (संगीत), सिद्धेश्वर स्वामीजी (अध्यात्म), लेंटिना आओ थक्कर (समाजसेवा), विक्रमचंद्र ठाकूर (विज्ञान आणि अभियांत्रिकी), रुद्रपत्नम नारायणस्वामी तारनाथन व त्यागराजन (संगीत), न्यूएन
तिएन थिएन (विदेशी नागरिक - अध्यात्म), भगिरथप्रसाद त्रिपाठी (साहित्य आणि शिक्षण), राजगोपालन वासुदेवन (विज्ञान आणि अभियांत्रिकी), मानसबिहारी वर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी), गंगाधर पानतवणे (साहित्य),
रोमुलूस विटाकर (वन्यजीव
संवर्धन), बाबा योगेंद्र (कला),
ए. झाकिया (साहित्य आणि शिक्षण).

Web Title: Ilyaaraaja, Ghulam Mustafa Khan 'Padma Vibhushan', 11 Honors in the 'Padma' Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.