How long will the supporters of unfaithfully Pawar : Chief Minister's devendra fadnavis ask question to harshwardhan patil | विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार : मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांना सवाल
विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार : मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांना सवाल

ठळक मुद्दे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे 

कळस : शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी होती. त्यामुळे  तुम्ही कितीही काम करा.  तुम्हाला ही मंडळी चित केल्याशिवाय राहणार नाही. किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मात्र मित्र होता म्हणून सांगतो तुमचा वाली कोण आहे ते तुम्ही ठरवा असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना केला. 
इंदापूर येथे महायुतीच्या उमेदवार  कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, . पक्षाच्या प्रमुखाला हवेची दिशा समजली त्यामुळे माढा मतदारसंघातून पळ काढावा लागला. त्यामुळे यांचे तर काय होईल? पंतप्रधान मोदीनी बेटी बचाओ असा नारा दिला. मात्र याचे अनुकरण पवार बेटी बचाओ असे सांगून करत आहेत . घरात घुसून मारण्याची भाषा यांच्याकडून केली जात आहे ही अनुकरणीय नाही. 
ते म्हणाले, मुळशी धरणाचा पाण्याचा प्रश्न सोडवुन या भागातील बावीस गावाना पाणी दिले जाईल. डबघाईला आलेल्या कारखान्यांना मदत केली. मात्र भीमा पाटस साखर कारखान्याला केवळ राजकीय हेतूने पुणे जिल्हा बँकेने मदत केली नाही. त्यामुळे राज्यशासन कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. 
 केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले  म्हणाले,  याठिकाणी आम्ही घुसुन मारु असे सांगतात मात्र आम्ही घुसुन तर दिले पाहिजे. 
 पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले,  मागील निवडणुकीचा वचपा काढा. धनगर समाजाचे नुकसान  पवारांनी केले.  मात्र धनगर समाजाला सवलती देण्याचे काम या सरकारने केले.
जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले, सत्तेतून पैसा व पैसातुन सत्ता धोरण विरोधकांनी राबीवले अनेकांची घर फोडण्याचे काम यांनी केले. यांना चारी मुंडी चित केले जाईल. 
 ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,  राष्ट्रवादी काँग्रेसकडुन जातीपातीचे राजकारण केले जात आहे. सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम केले. मात्र आता हे चालणार नाही. 
कांचन कुल म्हणाल्या, याठिकाणी विरोधकांची हुकुमशाही चालु आहे. आत्ता फोन करायला सुरूवात झाली आहे. 
या वेळी  दौंडचे आमदार राहुल कुल, उत्तम जानकर, मिथुन आटोळे यांची भाषणे झाली  पृथ्वीराज जाचक, सुनिल पोटे, राजेंद्र काळे, मारुती वणवे, भजनदास पवार, माऊली चवरे, दादासाहेब केसकर, नानासाहेब शेंडे, उपस्थित होते. 


Web Title: How long will the supporters of unfaithfully Pawar : Chief Minister's devendra fadnavis ask question to harshwardhan patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.