हर्षदीप कांबळे नासुप्रचे नवे सभापती

By admin | Published: September 2, 2014 01:16 AM2014-09-02T01:16:16+5:302014-09-02T01:16:16+5:30

नासुप्रचे सभापती व नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ‘मेट्रो मॅन’ प्रवीण दराडे यांच्यावर गणेशोत्सवातच विघ्न ओढवले आहे. त्यांची पुणे येथे मेडाचे

Harshardeep Kamble's new Speaker of Nasupara | हर्षदीप कांबळे नासुप्रचे नवे सभापती

हर्षदीप कांबळे नासुप्रचे नवे सभापती

Next

‘मेट्रो मॅन’ दराडे यांची बदली : मेट्रो रेल्वे भूमिपूजनामुळे विघ्न
नागपूर : नासुप्रचे सभापती व नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ‘मेट्रो मॅन’ प्रवीण दराडे यांच्यावर गणेशोत्सवातच विघ्न ओढवले आहे. त्यांची पुणे येथे मेडाचे (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. हर्षदीप कांबळे हे नासुप्रचे नवे सभापती म्हणून रुजू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दराडे यांनी पुढाकार घेतला होता. यामुळेच राज्य सरकारने दराडे यांची ‘साईड पोस्टिंग’ केल्याची चर्चा आहे.
प्रवीण दराडे यांनी यापूर्वी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. २ जून २०११ रोजी ते नासुप्रचे सभापती म्हणून रुजू झाले होते. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. मेट्रो रेल्वेचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करणे, शासनपातळीवर त्याचे सादरीकरण करणे, सुधारित आराखडा तयार करणे, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्यात दराडे यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन सोहळा राजकीय स्पर्धेतून गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित राहिले. हा सोहळा यशस्वी झाला. यात दराडे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याच वेळी दराडे हे मुख्यमंत्र्यांच्या ‘बॅड लिस्ट’मध्ये गेल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली होती. मोदींचा कार्यक्रम यशस्वी केल्याचे फळ म्हणून दराडे यांची पुण्यात साईड पोस्टवर बदली झाल्याचे आता बोलले जात आहे.
नासुप्रचे २०० कोटींवर असलेले बजेट ८०० कोटींवर नेण्यात त्यांना यश आले. दराडे यांनी त्यांच्या कार्यकाळात नागपूर मेट्रो रिजनची यशस्वी अंमलबजावणी केली. शहराबाहेर वसाहतींच्या विकासासाठी गुजरात पॅटर्न (लॅण्ड पुलिंग पॅटर्न) यशस्वीरीत्या राबविला. एनडीझेड (ना विकास क्षेत्र) मधील ले-आऊट नियमित केले. आरक्षणातून ले-आऊट वगळण्याच्या प्रक्रियेला गती दिली. ८० कोटी रुपयांची डांबरीकरणाची कामे करण्यास सुरुवात केली.
असे आहेत नवे सभापती
नासुप्रचे नवे सभापती म्हणून नियुक्ती झालेले डॉ. हर्षदीप कांबळे हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी एमबीबीएस ची पदवी घेतली आहे. १९९७ च्या बॅचमध्ये ते आयएएस झाले. वयाच्या २७ व्या वर्षी आयएएस होण्याचे कर्तुत्त्व त्यांनी केले. एसडीओ (अकोला), सीईओ, जिल्हाधिकारी (यवतमाळ) या पदांवर त्यांनी काम केले आहे. माजी केंदीय मंत्री मुकुल वासनिक यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी ते औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाले होते. तेथून ते आता नागपुरात येत आहेत.

Web Title: Harshardeep Kamble's new Speaker of Nasupara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.