Happy Diwali 2017 : डोंबिवलीतील फडके रोडवर अवतरली तरुणाई, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 09:06 AM2017-10-18T09:06:55+5:302017-10-18T11:33:22+5:30

मराठमोळ्या सणसोहळ्यांचे केंद्र बनलेल्या डोंबिवलीने दिवाळीचे पारंपरिक स्वरूप आजही राखले. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन दिवाळीच्या पहाटे डोंबिवलीच्या फडके रोडवर तरूण-तरूणींनी केलेली गर्दी याचेच एक प्रतिक आहे.

Happy Diwali 2017: Depression on Phondke Road in Dombivli; | Happy Diwali 2017 : डोंबिवलीतील फडके रोडवर अवतरली तरुणाई, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड

Happy Diwali 2017 : डोंबिवलीतील फडके रोडवर अवतरली तरुणाई, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड

Next

डोंबिवली -  मराठमोळ्या सणसोहळ्यांचे केंद्र बनलेल्या डोंबिवलीने दिवाळीचे पारंपरिक स्वरूप आजही राखले. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन दिवाळीच्या पहाटे डोंबिवलीच्या फडके रोडवर तरूण-तरूणींनी केलेली गर्दी याचेच एक प्रतिक आहे. यंदाही पहाटे अभ्यंगस्नान करून हजारो तरूण-तरूणी फडके पथावर जमले आहेत. त्यांच्या जोडीला विविध ढोल पथके देखिल असून  ढोल-ताशांचा खणखणाट आणि तरूणाईचा सळसळता उत्साह, यामुळे डोंबिवलीत वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.

नरकचतुर्थीच्या दिवशी अभ्यंगस्नानाने दिवाळी साजरी करून कुटुंबासह फराळ खाण्याकडे कल असला तरी हा फराळ खाण्यापूर्वी मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा प्रघात डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर सुरू झाला. डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील तरूणाईकडून साजऱ्या करण्यात येणाऱ्या दिवाळीने तर एक वेगळा ठसा  निर्माण केला आहे. पारंपरिक आणि आधुनिक वेशात तरूणाई आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी, तसेच आठवणींना उजाळा देण्याकरिता डोंबिवलीचा नाका समजल्या जाणाऱ्या फडके रोडवर आले आहेत.  

ग्रामदैवत गणेशाचे दर्शन आणि नंतर मित्रांसोबत हास्य विनोद, गप्पा-टप्पा, तर कुठेतरी चहा-नाष्टावर ही मंडळी ताव मारताना दिसून येत आहेत. विविध ढोल पथके आपली कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवित आहेत. या पथकात मुलीही मागे नाहीत. काही भगवे फेटे परिधान केलेले तरूण-तरूणी सेल्फी घेण्यात व्यस्त आहेत. गणेश मंदिर परिसरात भव्य सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली असून गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात स्थानिक नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे.

श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे युवा शक्ती भक्ती दिनाचे दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिवगौरव न्रुत्यालयाच्या वतीने वैभवशाली महाराष्ट्राचा मराठमोळा न्रुत्याविष्कार सादर करण्यात येत आहे. युवा-शक्ती दिनाचे यंदाचे हे १८ वे वर्ष आहे.

Web Title: Happy Diwali 2017: Depression on Phondke Road in Dombivli;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.