लाखो मुंबईकरांचा गाइड

By admin | Published: July 26, 2014 11:04 PM2014-07-26T23:04:48+5:302014-07-26T23:04:48+5:30

मुंबई धावते ती घडय़ाळाच्या काटय़ावर.. लाइफलाइन असलेली लोकल असो वा बस किंवा टॅक्सी अन् रिक्षाही मुंबईकरांसाठी स्वत:च्या वाहनांपेक्षा हीच साधने अधिक सोईची..

Guide to millions of Mumbaikars | लाखो मुंबईकरांचा गाइड

लाखो मुंबईकरांचा गाइड

Next
मुंबई धावते ती घडय़ाळाच्या काटय़ावर.. लाइफलाइन असलेली लोकल असो वा बस किंवा टॅक्सी अन् रिक्षाही मुंबईकरांसाठी स्वत:च्या वाहनांपेक्षा हीच साधने अधिक सोईची.. मुंबईकरांसाठी ह्याच सा:या सोई आता मोबाइलच्या एका ‘टच’वर आल्या आहेत. एम-इंडिकेटर असं ते अजब मोबाइल अॅप्लिकेशन, मुंबईकरांना अप-टू-डेट ठेवणारं़़़ केवळ प्रवासच नव्हे, तर मनोरंजनाच्या प्रत्येक कप्प्याची आणि मुंबईतील पर्यटनाच्या प्रत्येक कोप:याची माहिती या अजब अॅप्लिकेशनने थेट मोबाइलवर उतरवली आहे. हे अॅप्लिकेशन आता तब्बल 6क् लाख मुंबईकरांचे गाइड बनलेय. एम-इंडिकेटर नावाचे गारुड मुंबईकरांवर चालवणा:या सचिन टेके या तरुणाशी केलेली बातचीत़़़  
 
एम-इंडिकेटरची कल्पना कशी सुचली?
शाळा-कॉलेजपासूनच काहीतरी नवीन करण्याचा विचार होता आणि तोच एम-इंडिकेटरच्या माध्यमातून पुढे आला. व्हीजेटीआयमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर एका सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनीत होतो. त्या वेळी नेरूळहून कामासाठी जाताना मी सकाळी ठरल्यावेळेप्रमाणो लोकल ट्रेन पकडायचो, मात्र संध्याकाळी लोकल पकडताना अक्षरश: तारांबळ होत होती. या रोजच्या कसरतीतून सुटका करून घेण्यासाठी एक अॅप्लिकेशन हवे, अशी कल्पना सुचली. त्यातूनच एम-इंडिकेटरची निर्मिती झाली. अॅप्लिकेशन तयार करताना कोणी मदत केली?
सुरुवातीला सर्व मलाच करावे लागल़े  बाजारात मिळणारे रेल्वे वेळापत्रक, माहिती पुस्तक याचा (ु‘’ी3) आधार घेऊन सगळी माहिती गोळा केली. यानंतर लोकलच्या सर्व टाइमटेबलच्या जवळपास 84 हजार नोंदी या अॅप्लिकेशनमध्ये भरण्याचे किचकट कामही केले. या वेळी घरच्यांनीही  या  नोंदी भरण्यास मदत केली. 
सर्व मोबाइल फोन्ससाठी एम-इंडिकेटर हे अॅप्लिकेशन उपलब्ध आहे का ?
एम-इंडिकेटर हे सर्व मोबाइल फोन्ससाठी उपलब्ध आहे, पण आताचे अद्ययावत करण्यात आलेले नवीन व्हजर्न फक्त अँड्रॉइड मोबाइलधारकांना देण्यात आले आह़े यासाठी त्यांनी गुगल प्लेच्या (ॅॅ’ी स्र’ं8) माध्यमातून एम-इंडिकेटरचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.
नुकतेच एम-इंडिकेटरचे नवीन व्हजर्न लाँच केलंय, त्यात नावीन्य काय आहे?
नव्या व्हजर्नमध्ये मुंबईतील मेट्रो आणि मोनो या दोन महत्त्वाच्या नव्या सेवांचे टाइमटेबल, तिकिटांचा दर तसेच या नव्या सेवांचे बंधनकारक नियम याची माहितीही देण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रोसंदर्भातील तक्रारी छायाचित्रंसहित या नवीन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून करता येतील. एवढेच नाही तर फेरी बोटींचाही मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो़ त्यामुळे गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्ह्ज, अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, नायगाव जेट्टी ते पाणजू बेट, मढ-माव्रे-गोराई ते एक्सल वर्ड आणि भाऊचा धक्का ते मांडवा-रेवस-उरण या फेरी बोटींचे टाइमटेबल आणि तिकीटदर देण्यात आले आहे. प्रॉपर्टी संदर्भातील माहिती आणि पावसाचे अपडेट्सही डे-टू-डे पाहायला मिऴणार आहेत.  
पावसाचे अपडेट्स देण्याचे कसे काय सुचले?
पावसाळ्य़ात अनेकदा लोकांची गैरसोय होताना दिसत़े त्यानुसार कोठे जास्त पाऊस आहे, कोठे जास्त पाणी साचले आहे याची माहिती लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेच्या सहकार्याने एमसीजीएम अॅलर्ट्स (टउ¬ट अ’ी132) हे सेक्शन या अॅप्लिकेशनमध्ये दिले आह़े यामध्ये डे-टू-डे  हवामानाचे आणि पावसाचे अपडेट्स, समुद्रात येणा:या हाय टाइडचे अॅलर्ट्स आणि हवामानाचे अंदाज देण्यात आले आहे.
या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुला काही आर्थिक फायदा होतो का?
एम-इंडिकेटर हे अॅप्लिकेशन सोशल सव्र्हिस म्हणून बनविण्यात आले आह़े यामध्ये फायदा म्हणजे गुगल अॅड्सच्या माध्यमातून काही प्रमाणात जाहिराती आणि त्यातून काही आर्थिक मोबदला मला मिळतो. परंतु येत्या काही दिवसांत एम-इंडिकेटरवरील सध्या मोफत असलेले नाटकाचे सेक्शन कमर्शिअल करण्याचा विचार आहे.
शब्दांकन : रवळनाथ पाटील
 

 

Web Title: Guide to millions of Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.