मेथी, कोथिंबिरीच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:44 AM2018-10-08T11:44:01+5:302018-10-08T11:44:27+5:30

फळे,भाजीपाला : नाशिक बाजार  समितीमध्ये आवक कमी आणि मागणी वाढल्याने मेथी, कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली. 

Growth in fenugreek, coriander prices | मेथी, कोथिंबिरीच्या भावात वाढ

मेथी, कोथिंबिरीच्या भावात वाढ

googlenewsNext

नाशिक बाजार  समितीमध्ये आवक कमी आणि मागणी वाढल्याने मेथी, कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली. पितृपक्षामुळे पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. शुक्रवारी मेथीची जुडी १५ ते ३५, तर कोथिंबीर २५ ते ५६ रुपयांपर्यंत विक्री झाली. टोमॅटोची ४०५० क्ंिवटल आवक होऊन भाव ७५० रुपये मिळाला.

वांग्याची १३५ क्विंटल आवक झाली, तर सरासरी २५५० रुपये भाव मिळाला. फ्लॉवर १८५ क्ंिवटल आवक होऊन हजार रुपये, कोबी ४०२ क्ंिवटल आवक  होऊन भाव ५४१ रुपये, ढोबळी मिरचीची २९२ क्ंिवटल आवक होऊन २८०० रुपये, भोपळ्याची ५३४ क्ंिवटल आवक होऊन ९६० रुपये, कारल्याची ३२१ क्ंिवटल आवक होऊन हजार रुपये भाव मिळाला. काकडी ७३२ क्ंिवटल आवक (५०० ते २००० भाव), वालपापाडीची ४४५ क्ंिवटल आवक (१८५० ते २५०० रुपयांपर्यंत भाव) मिळाला. लासलगावात कांद्याला ९०० रुपये भाव मिळाला.

Web Title: Growth in fenugreek, coriander prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.