‘दिवसा सेनेवर तोंडसुख रात्री मुख्यमंत्र्यांची भेट’

By admin | Published: July 11, 2017 05:30 AM2017-07-11T05:30:00+5:302017-07-11T05:30:00+5:30

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आजकाल दिवसा शिवसेनेवर विनाकारण तोंडसुख घेतात आणि रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर जातात

'Greetings on the night with the Chief Minister' | ‘दिवसा सेनेवर तोंडसुख रात्री मुख्यमंत्र्यांची भेट’

‘दिवसा सेनेवर तोंडसुख रात्री मुख्यमंत्र्यांची भेट’

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आजकाल दिवसा शिवसेनेवर विनाकारण तोंडसुख घेतात आणि रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर जातात, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज केली.
कदम यांनी पत्र परिषदेत दावा केला की अजित पवार हे साधारणत: महिन्यापूर्वी रात्री एकच्या सुमारास फडणवीस यांना वर्षावर जाऊन भेटले होते. त्या भेटीमध्ये नेमके काय झाले, काही फायली काढल्या की स्वत:च्या बचावासाठी ते गेले होते हे मात्र आपल्याला माहिती नाही. कल्याण-डोंबिवली येथे बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले होते. सेनेची अवस्था गांडुळासारखी झाली असून दुटप्पी राजकारण करत दोन्ही बाजुंनी ढोल वाजवत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर कदम पत्र परिषदेत म्हणाले की, काविळ झाली आहे, त्यांना जग पिवळेच दिसणार.
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला, याची आकडेवारी मिळविण्यासाठी शिवसेनेने बँकांसमोर ढोलनाद आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी राज्यभरातील बँकांसमोर ढोलनाद केल्याची माहिती कदम यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बँकांकडून मिळणारी आकडेवारी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आकडेवारी तपासून पाहणार.

Web Title: 'Greetings on the night with the Chief Minister'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.