दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:57 PM2018-11-26T21:57:19+5:302018-11-26T22:00:31+5:30

या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे.

This government will not be able to regain power without riots - Prakash Ambedkar | दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

Next

पुणे - या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे. या सरकारला दंगली शिवाय पुन्हा सत्तेवर येत येणार नाही त्यामुळे दंगली होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असा कानमंत्र ऍड प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिनी संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील, लक्ष्मण माने तसेच इतर वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्तिथ होते. आंबेडकर म्हणाले,  26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. सर्वोच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुद्धा हा दिवस साजरा केला. गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वोच नायलयाच्या न्यायाधीशांनी जाहीरपने संविधान दिन साजरा केल्याचे ऐकवत नाही. यंदा मात्र त्यांनी हा दिवस जाहीर साजरा करून संविधान विरोधी लोकांना पुन्हा निवडून देऊ नका असाच आदेश दिला आहे.
 
    नोटा बंदीनंतर काळ्या नोटा कश्या बदलून दिल्या ते मोदींनी सांगायला हवं. नोटबंदीमध्ये 60-40 चा तुमचा सौदा होता. जलील तुमच्यावर केस झाली तर मी वकील होईल त्यातून मला मोदींना कोर्टात आणता येईल. तुमच्यावर केस झाली तर माझा पहिला साक्षीदार हे नरेंद्र मोदी असतील. कारण साक्षीदाराला काहीही विचारता येतं. या देशात टॅक्स न भरण हा एक व्यवहार आहे. त्याकडून टॅक्स घेणं योग्य आहार परंतु त्याला लुटलं जातंय. नोटा बदलण्याचा निर्णय उर्जित पटेलांचा होता. अरुण जेटली म्हणतायेत 6 महिने चालेल इतकंच गंगाजल आहे. 6 महिन्यांची गंगाजल आहे तर अरबीआय कडे पैसे मागण्यास का गेलात. एन पी ए मधील 80 टक्के पैसे परत येणार नाहीत अशी परिस्तिथी आहे. 2019 ला हे सरकार आलं तर तुमचं बँकेतील खाते बुडेल. सरकारकडे पैसे नसल्याने लोकांना पैसे बँकेतून काढण्यावर बंधने येत आहेत. मनुवाद आणायचा असेल तर लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत असावे लागतात. त्यामुळे मनुवाद आणण्यासाठी सरकार लोकांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करत आहे. 

परत आलेल्या नोटा किती होत्या हे सांगण्यासाठी दीड वर्ष का लागला असा प्रश्न आहे. मोदींनी नोटा बदलण्यासाठी 31 डिसेंम्बरची तारीख दिली पण एन आर आय लोकांना 31 मे पर्यंतची मुदत कशी दिली. मोगलाई मराठे म्हणतात आपल्या सत्तेत वाटा नको म्हणून ते 12 जागा देखील द्यायला तयार नाहीत. काँग्रेस आणि बी जे पी चं नातं काय आहे ते मला माहितीये. मला काही वेगळी दूषणं लावता येत नाही म्हणून काँग्रेस मला बिकाऊं म्हणते. सिंचन घोटाळ्यामध्ये कोण मंत्री आहेत त्याचं नाव मुख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाला सांगत नाही. मक्तेदारांची सत्ता गाडून टाकायला हवी. काँग्रेसला वाटते तेच केवळ सेक्युलर आहेत. 4 राज्यांच्या निवडणुकीनंतर चित्र वेगलं असेल. 

आयोध्याच्या विषयामुळे दंगल होईल. पोलीस म्हणताईत मला संरक्षण घ्या. कारण त्यानां माहितीये कि दंगल होणार आहे. दंगलीशिवाय या सरकारकडे काही राहिलेलं नाही. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे दंगल होणार नाही याची दक्षात आपण घ्यायला हवी.  मोदींच्या चेहऱ्यावरची रोनाक गेलीये आता चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. चिंतेने ग्रासलेला माणूस काहीही करू शकतो. म्हणून आता आयोद्धचा प्रश्न उपस्तिथ केला जात आहे. एक माहोल तयार केला जातोय. हा माहोल दंगलीसाठी तयार केली जात आहे. दंगलीशिवाय या सरकारला पून्हा सत्तेवर येता येणार नाही. या देशात बदल आणायचा असेल तर संविधानिक मार्गाने आणायला हवा.

Web Title: This government will not be able to regain power without riots - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.