‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करा, विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:48 AM2017-11-11T05:48:34+5:302017-11-11T05:48:49+5:30

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे.

Give felicity to the construction workers about the 'transparent' operation, the opponent aggressor | ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करा, विरोधक आक्रमक

‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करा, विरोधक आक्रमक

Next

मुंबई : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना मॅनेज करा, हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे.
‘डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, बांधकाममंत्र्यांचा अजब सल्ला’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकांम मंत्र्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.
चंद्रकांतदादा म्हणतात तसे सार्वजनिक बांधकाम खाते वर्र्षाला ४ हजार कोटी रुपये खर्च करीत असेल तर मागील तीन वर्षात खर्च
झालेले १२ हजार कोटी रुपये कुठे गेले? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, राज्यात पारदर्शक भ्रष्टाचार सुरु आहे. अधिकाºयांना भ्रष्टाचार कसा करायचा याचे सल्ले महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या मंत्र्याने दिले नव्हते. पाटील यांनी ती कमतरता भरून काढली आहे. त्यामुळे त्यांचा शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार केला पाहिजे. राज्याचा कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
यासोबतच पत्रकारांना मॅनेज करून चांगल्या बातम्या छापून आणा असे सांगण्याने माध्यमांच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे होते, असेही सावंत म्हणाले.

Web Title: Give felicity to the construction workers about the 'transparent' operation, the opponent aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.