गांधीजींनाही फाळणी मंजूर नव्हती- शेषाद्री चारी

By admin | Published: June 3, 2016 05:13 PM2016-06-03T17:13:09+5:302016-06-03T19:19:17+5:30

महात्मा गांधी यांनाही फाळणीचा निर्णय मंजूर नव्हता, तसेच नेहरू,पटेल यांनीसुद्धा फाळणीस विरोध केला होता, असे वक्तव्य भाजपच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी केले

Gandhiji was not even allowed to split- Seshadri Chari | गांधीजींनाही फाळणी मंजूर नव्हती- शेषाद्री चारी

गांधीजींनाही फाळणी मंजूर नव्हती- शेषाद्री चारी

Next

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 3 - महात्मा गांधी यांनाही फाळणीचा निर्णय मंजूर नव्हता, तसेच  नेहरू,पटेल यांनीसुद्धा फाळणीस विरोध केला होता, असे वक्तव्य भाजपच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी केले. लोकमतच्या 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध' चर्चासत्रात ते बोलत होते.
' नागपुरात येणं हे माझं सौभाग्य आहे. भारत आणि पाकमध्ये कोणतीही भिंत नाही, ती मनुष्यनिर्मित आहे' , असंही ते म्हणाले आहेत. माणसांना असले तरी प्राण्यांना सीमेचे बंधन नसते. 1947मध्ये आजचे 70 टक्के लोक नसल्याचं प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केलं आहे.
 
 
शेषाद्री चारी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 
 
- फाळणी गांधीजींना पण मंजूर नव्हती, नेहरू,पटेल यांनीसुद्धा विरोध केला होता
-इस्लामाबादमध्ये मला खूप छान अनुभव आला. कपडे विक्रेत्याने मला दिल्लीतून कपडे विकत घेण्याचा सल्ला दिला. लोक     मनाने जुळले आहे.
- दोन्ही देशात चर्चा व्हावी यासाठी जवळपास सर्वच पंतप्रधानांनी प्रयत्न केले
 - वाजपेयी पाकमध्ये प्रसिद्ध होते. एक पत्रकार म्हणाला होता की ते पाकमधून पण निवडणूक जिंकू शकले असते. 
-  पण पाकमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको
- भारतासमोर नेमके कोणाशी बोलावे हा प्रश्न उपस्थित होतो.
- पाकमध्ये अस्थिर व्यवस्था आहे. दोन्ही देशात व्यापारी संबंध वाढले पाहिजेत
- सर्व मुद्द्यांवर बोलण्यास भारत तयार
 

 

Web Title: Gandhiji was not even allowed to split- Seshadri Chari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.