आघाडीचा फॉम्यरुला दिल्लीत!

By admin | Published: July 27, 2014 01:52 AM2014-07-27T01:52:13+5:302014-07-27T01:52:13+5:30

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चा करुन जागा वाटपाचा फॉम्यरुला ठरवतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आह़े

Front formula in Delhi! | आघाडीचा फॉम्यरुला दिल्लीत!

आघाडीचा फॉम्यरुला दिल्लीत!

Next
>मुंबई : राज्यातील काँग्रेससोबतच्या विधानसभा जागा वाटपाबाबतचा निर्णच नवी दिल्लीत होणार असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चा करुन जागा वाटपाचा फॉम्यरुला ठरवतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आह़े 
शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या निवास्थानी शनिवारी रात्री झाली़ तेव्हा ही भूमिका घेण्यात आली़ बैठकीनंतर पत्रकारांना तटकरे यांनी सांगितले, की राष्ट्रवादीला 144 जागाच हव्यात, अशी भूमिका समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दोन दिवसांपूर्वीच आम्ही मांडली आह़े आता समन्वय समितीच्या पातळीवर चर्चा न होता, दिल्लीत फॉम्यरुला ठरेल़ 
राष्ट्रवादीच्या आजच्या या भूमिकेमुळे जागा वाटपाचा फॉम्यरुला ठरविण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बाजूला ठेवण्याचा पवित्र राष्ट्रवादीने घेतल्याचे स्पष्ट झाल़े चव्हाण आणि ठाकरे यांनी राष्ट्रवादीला 144 जागा कुठल्याही परिस्थितीत देता येणार नाही, असे ठामपणो सांगितले होत़े त्यामुळे या दोघांनाही डावलून थेट काँग्रेस श्रेष्ठींकडून 144 जागा पदरात पाडून घेण्याची चाल राष्ट्रवादीने खेळली आह़े त्याला काँग्रेस कसा प्रतिसाद देतो, हे महत्त्वाचे ठरणार आह़े 
तटकरे यांनी काँग्रेसला सुनावले की, नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदार संघात काँग्रेसला मिळालेल्या विजयात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे, हे काँग्रेसने विसरू नय़े महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या कृपेमुळे चार जागा मिळाल्या, असा चिमटा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी काढाला होता़ तो राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आह़े सूत्रंनी सांगितले की, राष्ट्रवादीला 144 जागा मिळणार नसतील, तर आपण वेगळे लढले पाहिजे, अशी कार्यकत्र्याची भावना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे आजच्या बैठकीत म्हणाल़े तथापि वेगळे लढणो दोघांच्या हिताचे नसल्याने अशी भाषा न करण्याची समज शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांना दिली़ (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Front formula in Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.