साक्री तालुक्यात उपक्रमशील शेतकरी यांनी केला डॉ.नरेंद्र भदाणे गुलाब शेतीचा पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 08:22 AM2019-02-16T08:22:53+5:302019-02-16T08:24:19+5:30

एकाच पिकावर अवलंबून न राहता व पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे.

Farmer in Sakri taluka did the first experiment of rose farm | साक्री तालुक्यात उपक्रमशील शेतकरी यांनी केला डॉ.नरेंद्र भदाणे गुलाब शेतीचा पहिला प्रयोग

साक्री तालुक्यात उपक्रमशील शेतकरी यांनी केला डॉ.नरेंद्र भदाणे गुलाब शेतीचा पहिला प्रयोग

googlenewsNext
ठळक मुद्देआधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे.डॉ.भदाणे यांनी एक एकर पालॉहाऊसमध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल गुलाबाची लागवड केली आहे.

- विशाल गांगुर्डे

धुळे - एकाच पिकावर अवलंबून न राहता व पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे. डॉ.नरेंद्र रावसाहेब भदाणे हे एक तरुण शेतकरी आहेत. शेती करताना भविष्यातील गरज लक्षात घेता शेती उत्पन्न घेण्याची त्यांची पद्धत असल्याने शेतीत नवनव्या शेतीपुरक उत्पन्नांची निर्मिती करत असतात.

डॉ.भदाणे यांनी एक एकर पालॉहाऊसमध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल गुलाबाची लागवड केली आहे. साधारण ३२ हजार रोपांची लागवड त्यांनी आॅगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात केली व ५० ते ५५ दिवसानंतर त्यांनी लाल गुलाब फुलाचे उत्पन्न घेणे सुरू केले आहेत. सध्या बांधावर हे फुल १० रुपये नगाने विक्री होत आहे. दररोज साडेतीन ते चार हजार फुल एका दिवसाला निघत असल्याने डॉ.भदाणे हि फुले सध्या दिल्ली, बडोदा, सुरत व नागपूर मार्केटमध्ये विक्रीसाठी जात आहे. शेताच्या बांधावरच व्यापारी येत असल्ळाने कुठल्याही प्रकारचा इतर खर्च शेतकऱ्यास नाही.

डॉ.भदाणे यांनी व्हॅलेंटाईन-डे फेब्रुवारीत असल्याने लाल गुलाबाला मागणी देशभरात असल्याने त्या नियोजनाने ही शेती केली आहे. सदर गुलाब शेतीला दररोज १५ ते २० मिनीट पाणी द्यावे लागते. सदर गुलाब शेतीसाठी हलक्या मुरमाड जमिनीत फुल चांगले येते असे डॉ.भदाणे यांनी यावेळी सांगितले.

डॉ.भदाणे हे प्रगतशील शेतकरी असल्याने ते आपल्या शेतात नवनवीन पद्धतीची शेती करतात त्यांची शेती सध्या शेतकºयांना रोलमॉडेल म्हणून ओळखली जाते. गुलाब शेतीची प्रेरणा त्यांना पुणे, तळेगाव, दाभाडी येथे ट्रेनिंगसाठी गेले असता मिळाली. डॉ.भदाणे यांनी सद्धा आपल्या शेतात २ एकरमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. तर १० एकरमध्ये डाळींबाची शेती ते करीत आहेत, शेततळे आहे.

शेती क्षेत्रात बदल होणे गरजेचे आहे. आधुनिक पद्धतीने शेती करीत असताना भविष्याची गरज लक्षात घेता शेती उत्पादनाचे पिक घेतले पाहिजे. तरुण शेतक-यांनी नवनवीन उपक्रमाकडे वळावे. यामुळे शेतीत अधिक बदल होऊ शकतो व शेतकºयाचा विकास होईल..
- डॉ.नरेंद्र रावसाहेब भदाणे,
सामोडे, पिंपळनेर

Web Title: Farmer in Sakri taluka did the first experiment of rose farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.