दिलीप हांडे यांना डॉ एस.के. शोम पुरस्कार , विदर्भासह मराठवाड्यातील एकमेव संशोधक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 04:23 PM2017-12-07T16:23:37+5:302017-12-07T16:25:00+5:30

इंडियन मायकॉलॉजीकल सोसायटीची राष्ट्रीय परिषद जम्मू विद्यापीठ येथे पार पडली. यामध्ये येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रा. दिलीप हांडे यांना प्रतिष्ठेचा डॉ. एस.के.शोम पुरस्कार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व शिमला विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. लखनपाल यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला.

Dr S.K. Dilip Hande Shame Award, the only researcher from Marathwada with Vidarbha | दिलीप हांडे यांना डॉ एस.के. शोम पुरस्कार , विदर्भासह मराठवाड्यातील एकमेव संशोधक

दिलीप हांडे यांना डॉ एस.के. शोम पुरस्कार , विदर्भासह मराठवाड्यातील एकमेव संशोधक

Next

अमरावती : इंडियन मायकॉलॉजीकल सोसायटीची राष्ट्रीय परिषद जम्मू विद्यापीठ येथे पार पडली. यामध्ये येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रा. दिलीप हांडे यांना प्रतिष्ठेचा डॉ. एस.के.शोम पुरस्कार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व शिमला विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. लखनपाल यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला. यावेळी चेन्नईचे एन.रामन, सुधाकर रेड्डी, नरेंद्र अन्नी, पंजाब विद्यापीठ पटियाला येथील अवमीन पाल सिंग जम्मू विद्यापीठाच्या गीता सुबली यांनी त्यांना सन्मानित केले. डॉ.एस.के. शोम हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. चेन्नई विद्यापीठाचे वनस्पती शास्त्र विभागप्रमुख व आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ सी.व्ही. सुब्रमण्यम यांनी १९७३ मध्ये या सोसायटीची स्थापना केली. कवक (बुरशी) शास्त्रात संशोधन करणाºयांना प्रोत्साहित करणे हा या स्थापनेमागील उद्देश आहे. देशातील ४०० शास्त्रज्ञ या संस्थेशी जुळले आहेत. हांडे हे २० वर्षांपासून या विषयावर संशोधन करीत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय जैवसंपदा कार्यशाळा पालमपूर, हिमाचल प्रदेश येथे संशोधन कार्य केले होते.

Web Title: Dr S.K. Dilip Hande Shame Award, the only researcher from Marathwada with Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.