Dr. Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आणखी तिघांच्या घराची झडती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:33 AM2018-08-21T10:33:39+5:302018-08-21T10:34:12+5:30

Dr. Dabholkar murder case: सचिन अंदुरेच्या अटकेनंतर याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घराची झडती घेतली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. 

Dr. Dabholkar murder case: The search for the trio's house | Dr. Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आणखी तिघांच्या घराची झडती

Dr. Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आणखी तिघांच्या घराची झडती

Next

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपी सचिन अंदुरेला सीबीआयने अटक केली आहे. सचिन अंदुरेच्या अटकेनंतर याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घराची झडती घेतली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे औरंगाबादमधील पैठण रोड आणि देवळाई येथील सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी एटीएसच्या पथकाने धाड टाकली. यावेळी त्यांच्याकडून काही स्फोटकांचा साठा जप्त केल्याचे समजते. तसेच, त्यांना एटीएसने ताब्यात घेल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.   

दरम्यान, नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला अटक करण्यात आली आहे. सचिन औरंगाबादमध्ये एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करत होता. सचिन अंदुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. 
 

Web Title: Dr. Dabholkar murder case: The search for the trio's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.