अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 07:01 PM2017-08-15T19:01:23+5:302017-08-15T19:10:33+5:30

भरती सुरु झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किनाऱ्याकडे परत येताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाेघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत.

DNA tourists drown in Alibaug sea, disappearance | अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडून बेपत्ता

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडून बेपत्ता

googlenewsNext

- जयंत धुळप 
अलिबाग, दि. 15 - भरती सुरु झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किनाऱ्याकडे परत येताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने साैरभ खान (23, सद्या रा.कशेडे-रसायनी,मुळ रा.मध्यप्रदेश) आणि ऋषभ सिव्हा (24, सध्या रा.रसायनी,मुळ रा.गाेवा) हे दाेघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही दूर्देेवी घटना घडली असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

अपघाताचे वृत्त समजताच अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी तत्काळ समुद्र किनारी पाेहाेचून, बुडालेल्या पयर्टकांच्या शाेधाकरीता अलिबाग काेळी बांधवांच्या सहकार्याने बाेटी उपलब्ध करुन दिल्या, परंतू या शाेध कार्यास यश आले नाही. भरतीच्या प्रवाहा बराेबर हे दाेघेही रेवदंडा समुद्र किनाऱ्याकडे वाहात गेले असावेत असा अंदाज जाणकार काेळी बांधवांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट, अलिबाग तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी समुद्र किनारी पाेहाेचून शाेध कार्याकरिता नियाेजन केले.

रसायनी मधील डेकाेर हाेम कंपनीमध्ये सिव्हील ईंजिनियर म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच मित्र अलिबाग समुद्र किनारी पर्यटना मंगळवारी पयर्टनार्थ आले हाेते. त्यापैकी तिघांनी अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पहाण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी समुद्रास पूर्णपणे आेहाेटी हाेती. ते तिघेही चालत किल्ल्यात गेले. परत येताना भरतीचे पाणी भरु लागले. त्यांनी त्याच भरतीच्या पाण्यातून किनाऱ्याकडे येण्यास प्रारंभ केला. भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग याचा अंदाज न आल्याने साैरभ खान आणि ऋषभ सिव्हा हे दाेघे प्रवाहात वाहत जावून समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा तिसरा सहकारी मित्र सुरेश स्वामी (सध्या.रा.रसायनी, मुळ-अक्कलकाेट) हा सुदैवाने पाेहत समुद्र किनारी पाेहाेचला. त्याने आपल्या अन्य दाेघा मित्रांचा किनाऱ्यावर प्रथम शाेध घेतला. त्यानंतर त्यांनी अलिबाग पाेलीसांशी संपर्क साधल्यावर, तत्काळ ही शाेध माेहिम सुरु करण्यात आली आहे.

अलिबागच्या समुद्रात दाेघे पर्यटक बुडाले असताना, त्यांना शाेधण्याकरिता शाेध माेहिम सुरु असताना, याच किनाऱ्यावरीस भरतीच्या पाण्यात किमान 200 पर्यटक पाण्यात पाेहात आणि डूंबत हाेते. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्यात जावू नका असे स्थानिक नागरिकांनी या पैकी काही जणांना सागीतले परंतू त्याकडे दूर्लक्ष करुन पयर्टक समुद्रात डूंबतच हाेते.

Web Title: DNA tourists drown in Alibaug sea, disappearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.