शिवनेरी अपघातातील मृतांना एसटीकडून 10 लाख रुपये- दिवाकर रावते 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 09:49 PM2018-01-31T21:49:39+5:302018-01-31T21:49:55+5:30

पुण्यातील खडकी येथे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या इंजिन पेटीचे आवरण अचानक अर्धवट उघडल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा धक्का लागून २ जण मृत्युमुखी पडले आहेत.

Diwakar will give 10 lakh rupees to the deceased in Shivneri accident - ST | शिवनेरी अपघातातील मृतांना एसटीकडून 10 लाख रुपये- दिवाकर रावते 

शिवनेरी अपघातातील मृतांना एसटीकडून 10 लाख रुपये- दिवाकर रावते 

Next

मुंबई - पुण्यातील खडकी येथे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या इंजिन पेटीचे आवरण अचानक अर्धवट उघडल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा धक्का लागून 2 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी झाले, यापैकी मृत पादचाऱ्यांच्या वारसांना एसटीकडून प्रत्येकी 10 लाख रुपये तर जखमींना एसटीच्या प्रचलित नियमानुसार रुग्णालयाचा उपचाराचा सर्व खर्च एसटीमार्फत केला जाणार असल्याची घोषणा मा. परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. 

या प्रकरणी एसटी महामंडळाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली असून, संबंधित चालकालासह या बसच्या दुरुस्तीचे काम करणारे दोन सहाय्यक(मॅकेनिक) यांना प्राथमिक अहवालानुसार कामात हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. तसेच झालेल्या अपघाताची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणा-या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून देणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमात करण्यात आली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भातील सादरीकरण करून योजनेची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करून देणा-या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही प्रारंभ झाला.

‘स्लीपर शिवशाही’ व ‘लालपरी’चे लाँचिंग
शयनयान (स्लीपर कोच) शिवशाही बसचे अनावरण करण्यात आले. त्साध्या बसचे ‘लालपरी’ हे नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून त्याचेही अनावरण देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी युवतींना एसटी चालक पदासाठी प्रशिक्षण व नियुक्ती देण्याच्या योजनेचाही प्रारंभ झाला. गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागातील योजनांचा प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलग्रस्त तरु णांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेली बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना महत्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, एसटीची स्थानके तसेच एसटी बसेस आता बदलत आहेत.

आदिवासी, समर्पण केलेले नक्षलग्रस्त तरुण, आपत्तीग्रस्त शेतमजूर, शहीद जवानांच्या पत्नींसाठी सुरू केलेल्या योजना महत्त्वाच्या आहेत.
नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी एसटी महामंडळ योगदान देईल, असे रावते यांनी सांगितले. एसटी महामंडळातील अधिकाºयांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रु पयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा. अरविंद सावंत, अनिल देसाई, आ. वारिस पठाण, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

Web Title: Diwakar will give 10 lakh rupees to the deceased in Shivneri accident - ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.